सोलापूर बातमीसोलापूर अपघातसोलापूर सामाजिक

बापरे..! पुन्हा एका तरुणाने केली आत्महत्या ; मोदी येथील घटना…

शहरात दिवसेंदिवस आत्महत्या करण्याचे प्रकरण हे वाढत चालले आहे. गेल्या काही दिवसात अनेकांनी आत्महत्या करत आपले जीवन संपवले त्यामध्ये डॉक्टर , नामांकित कॉलेजचे विद्यार्थी असो, तरुण तरुणी अल्पवयीन मुलींचा समावेश आहे.
कालच एका बारा वर्षीय अल्पवयीन मुलीने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच आज 27 एप्रिल 2025 रोजी सकाळच्या सुमारास मोदी परिसरातील एका 23 वर्षीय तरुणाने आत्महत्या करत आपले जीवन संपवले.
त्या तरुणाचे नाव सागर बापू गोपी रेड्डी वय वर्ष 23 राहणार 144 शमा नगर झोपडपट्टी मोदी सोलापूर असे आहे.
नातेवाईकांच्या मदतीने त्याच खाली उतरून सोलापुरातील शासकीय रुग्णालया अर्थात सिविल हॉस्पिटल या ठिकाणी दाखल केले असता उपचारापूर्वीच मयत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तर सदर घटनेची नोंद सिविल पोलीस चौकीत झाली आहे.
तर याबाबत नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ NIHM नुसार कोणीही एवढ्या टोकाचे पाऊल सहजासहजी उचलत नाही.
आत्महत्या सारख्या मोठं पाऊल कोणीही अचानक उचलत नाही तज्ञांच्या मते आत्महत्या करणारा व्यक्ती खूप दिवसापासून आत्महत्येच्या विचार करत असतो.
दिवसेंदिवस वाढत चाललेली घटना हे कुठेतरी थांबले पाहिजे.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel