solapur mim newsजिल्हाधिकारी कार्यालय सोलापूरन्यायालय निर्णयमहाराष्ट्रराजकीयसोलापूर बातमीसोलापूर महानगरपालिकासोलापूर राजकीयसोलापूर सामाजिक

आमदार विजयकुमार देशमुख यांनी घेतली महापालिका आयुक्तांची भेट हे विषयावर चर्चा करण्यात आली…

आमदार विजय देशमुख यांनी आज रोजी महानगरपालिका येथील महापालिकेचे आयुक्त यांच्या दालनात, नॅशनल हायवे अधिकारी,भूमी संपादन विशेष अधिकारी व नगर रचना विभाग यांच्या समवेत सोलापूर शहरातील मंजूर झालेल्या दोन्ही उड्डाणपूलाचे काम प्रलंबित असल्याने आज यावर बैठकीत चर्चा करण्यात आली. या बैठकीत छत्रपती संभाजी महाराज चौक ते पत्रकार भवन व जुना बोरामणी नाका ते पत्रकार भवन पर्यंतच्या उड्डाण पुलाचे पूर्ण बाधित जागेचे हस्तांतरण मनपा कडून 25 मे पर्यंत करण्यात येणार आहे. त्यानंतर नॅशनल हायवे कडून 2 महिन्यात निविदा प्रक्रिया राबवून प्रत्यक्षात काम सुरू करण्याबाबत आमदार विजय देशमुख यांनी इतर संबंधित अधिकाऱ्यांन समवेत चर्चा केले. तसेच सोलापूर शहरातील त्या दोन्ही उड्डाणपुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे असे संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.

प्रसंगी महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओंबासे, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, मा. सभागृहनेते शिवानंद पाटील, आदी उपस्थित होते.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel