सोलापूर बातमीमहाराष्ट्रशैक्षणिकसोलापूर महानगरपालिकासोलापूर सामाजिक

दहावी विद्यार्थ्यांचा गौरवसोहळा आणि यशाचा जल्लोष राष्ट्रसंत प्राथमिक शाळा व विश्वभूषण विद्यालयांमध्ये शुभेच्छा समारंभ व पारितोषिक वितरण उत्साहात संपन्न…

अक्कलकोट रोडवरील, सद्संकल्प शिक्षण समूहाच्या राष्ट्रसंत प्राथमिक शाळा व विश्वभूषण विद्यालयांमध्ये इयत्ता दहावी विद्यार्थ्यांसाठी शुभेच्छा समारंभ व वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ 2025-26 मोठ्या उत्साहात आणि आनंदी वातावरणात संपन्न झाला. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, क्रीडा आणि सांस्कृतिक यशाचा गौरव करत प्रेरणादायी वातावरणात हा सोहळा पार पडला.
*या कार्यक्रमाचे अध्यक्षसथानी संस्थेचे संस्थापक सचिव समाजभूषण अण्णासाहेब भालशंकर हे होते तर प्रमुख पाहणे म्हणून प्रा डॉ.प्रकाश नांगरे (उपशिक्षण अधिकारी,माध्यमिक शिक्षण विभाग, सोलापूर) , राजेंद्र वारगड प्रशासन अधिकारी पंचायत समिती उत्तर सोलापूर, शुभम संजीव सदाफुले ( उपसंचालक -कृषी विभाग) तसेच सद्संकल्प शिक्षण समूहाचे पदाधिकारी बोधीप्रकाश गायकवाड , रत्नदीप कांबळे ,संचालक, सौ. मंजुश्री खंडागळे (मुख्याध्यापिका, राष्ट्रसंत प्राथमिक शाळा) व सत्यवान पाचकुडवे (मुख्याध्यापक, विश्वभूषण विद्यालय) उपस्थित होते.

कार्यक्रमात प्रमुख अतिथी उपशिक्षणाधिकारी प्रकाश नांगरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना दहावी हा जीवनातील महत्त्वाचा टप्पा असल्याचे सांगितले. यशासाठी सातत्य, शिस्त आणि सकारात्मक दृष्टिकोन आवश्यक असून विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने पुढील शैक्षणिक वाटचाल करावी, असे त्यांनी नमूद केले. त्यांनी गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत मूल्यसंस्कारांचे महत्त्व अधोरेखित करत विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

शुभम संजीव सदाफुले यांनी थोडक्यात मार्गदर्शन करत मेहनत, चिकाटी आणि वेळेचे नियोजन ही यशाची गुरुकिल्ली असल्याचे सांगितले. ग्रामीण व शहरी विद्यार्थ्यांनी संधींचा योग्य वापर करून स्वतःची ओळख निर्माण करावी, असे त्यांनी आवाहन केले.

प्रशासन अधिकारी राजेंद्र वारगड यांनी सविस्तर मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांनी स्पर्धात्मक युगात केवळ गुणांवर नव्हे तर कौशल्यांवरही भर द्यावा, असे सांगितले. त्यांनी शासकीय योजनांची माहिती देत विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षणासाठी उपलब्ध संधींचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले..
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना समाजभूषण अण्णासाहेब भालशंकर यांनी शाळेची व संस्थेची वाटचाल याविषयी माहिती दिली विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेचे कौतुक केले.

कार्यक्रमात वर्षभरात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना पारितोषिके व प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि अभिमानाचे भाव पाहायला मिळाले.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक मुख्याध्यापक सत्यवान पाचकुडवे यांनी केले, तर सूत्रसंचालन प्रवीण पाटील यांनी प्रभावीपणे पार पाडले. शेवटी आभार प्रदर्शन धारेप्पा तळे यांनी मानले. कार्यक्रमाला शिक्षक व विद्यार्थ्यांची मोठी उपस्थिती लाभली.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel