दिल्लीत शिवरायांचे राष्ट्रीय स्मारक व्हावे म्हणून प्रयत्न करणार – देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मी आम्ही दोघेही मावळे आहोत, त्यामुळे दिल्लीत महाराजांचे राष्ट्रीय स्मारक व्हावे म्हणून प्रयत्न करणार, आम्ही लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहोत, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ते किल्ले रायगडावर बोलत होते. निमित्त होते 350 शिवराज्यभिषेक दिन सोहळ्याचे.
सहा महसूली विभागात उद्यान उभारणार
राज्यातील सहाही महसूली विभागात शिवरायांच्या जीवनावर त्यांच्या इतिहास सांगणारे उद्याने निर्माण केले जातील, अशी घोषणा देवेंद्र फडवणीस यांनी केली. विशेष म्हणजे यासाठी पहिल्याच टप्प्यात निधी उपलब्ध करून दिला जाईल, असा मानस फडणवीसांनी व्यक्त केला.
प्रतापगड प्राधिकरणाची मागणी मान्य होईल
उदयनराजे भोसले यांनी मागणी केल्याप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रतापगड प्राधिकरणाची मागणी मान्य करतील, असा विश्वास देवेंद्र फडवणीस यांनी व्यक्त केला.
सूर्य-चंद्र असेल तो पर्यंत शिवरायांचे नाव राहील
स्वराज म्हणजे काय जाणते राज्य काय असतात. कधीही कोणाची तमा बाळगली नाही. जलसंधारणाचे धडे आजही आमच्या साठी आदर्श आहेत. कायद्याची न्यायाची व्यवस्था आजही उपयुक्त ठरते. छत्रपती शिवराय नसते तर आम्ही कुठे असतो, हा विचार देखील डोळ्यासमोर येतो. राज्य-व्यवहार मराठीत व्हावे म्हणून कोश तयार केला, त्यांचे जीवन आम्हाला आदर्श देणारे आहे. असे प्रतिपादन फडणवीस यांनी केले.
एकत्र बैठक घेऊन गड किल्ल्यांचे कामे मार्गी लावू
एएसआय निर्बंध असल्याने येथील काम धीमीगतीने होतात. आता त्यासाठी केंद्राची एकत्रित बैठक घेऊन येथील कामाला गती दिली जाईल, असे आश्वासन फडवीसांनी दिले.