क्राईममहाराष्ट्रसोलापूर क्राईमसोलापूर बातमी

दिवसा घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार, शहर गुन्हे शाखेकडुन जेरबंद

फिर्यादी पदमावती प्रदीप चिल्ला वरा-४३ वर्षे, व्यवसाय गृहिणी रा. प्लॉट नं. १५. मुक्तेश्वर नगर, ज्ञानेश्वर नगर बस स्टॉप समोर, जुळे सोलापूर ह्या, ०५ मे २०२४ रोजी, त्यांचे पती प्रदीप चिल्ला यांचा वाढदिवस असल्याने, सकाळी ११:०० या.चे सुमारास, त्या स्वतः, पत्ती व त्यांच्या दोन मुली असे सर्वजण मिळून अक्कलकोट येथे देवदर्शनासाठी घराला व गेटला कूलूप लावून गेल्या होत्या. देवदर्शन आटोपून, त्या जूळे सोलापूरातील राहते घरी, दुपारी ०२:१५ वा. चे सुमारास परत आल्या असता, त्यांना गेटचे व घराचे कुलूप तोडून कोणीतरी अज्ञात इसम घराच शिरल्याचे त्यांना दिसून आले. फिर्यादी व त्यांची मुलगी निरजा यांनी बेडरुममध्ये जावून पाहिले असता, एक इसम घरात चोरी करीत असताना त्यांनी पाहिले. सदर अज्ञात चोरट्याने फिर्यादी यांचे मुलीस धक्का मारला व तो चोरी केलेले सोन्याचे दागिने सोबत घेवून पळून गेला. सदर घटनेबाबत यातील फिर्यादी सी. पदमावती चिल्ला यांनी विजापूर नाका पोलीस स्टेशन सोलापूर शहर येथे दिलेल्या फिर्यादी वरुन अज्ञात चोरट्या विरुध्द गुन्हा रजि नं. २१६/२०२४ भा.दं.वि कलम ४५४, ३८० प्रमाणे दिवसा घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदरचा घरफोडीचा गंभीर स्वरुपाचा गुन्हा हा दिवसा भर लोकवस्ती मध्ये घडल्याने, पोलीस आयुक्त सोलापूर शहर यांचे मार्गदर्शनानुसार, गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्त डॉ. दीपाली काळे, सहा. पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे तसेच गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल दोरगे यांनी गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचेसह घटनास्थळास भेट दिली व घरफोडीचा गंभीर स्वरुपाचा गुन्हा उघडकीस आणणे बाबत मार्गदर्शन केले होते. त्याअनुषंगाने गुन्हे शाखेडील सपोनि दादासो मोरे व पथकातील पोलीस अंमलदार है तांत्रीक पुरावे व बातमीदारा मार्फत गुन्हा उघडकीस आणणेचा कसोशीने प्रयत्न करीत होते.

२१ मे २०२४ रोजी सपोनि दादासो मोरे याचे पथकातील पोलीस अंमलदार इम्रान जमादार व संदीप जावळे यांना वातमीदारामार्फत चातमी मिळाली की, रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार बाबू खाजप्पा मुंगली याने काही दिवसापूर्वी जुळे सोलापूरात दिवसा घरफोडी केलेली आहे”, सपोनि मोरे व पथकाने बातमीदाराकडून मिळालेल्या बातमीची, तसेच कौशल्याने मिळवलेल्या तांत्रीक माहितीची खातरजमा करुन, सदरचा गुन्हा हा सराईत गुन्हेगार बाबू मुंगली यानेच केला असल्याची खात्री केली. त्यानंतर मिळाले बातमी प्रमाणे सपोनि मोरे व पथकातील अंमलदार यांनी आरोपी नागे बाबू खाजप्पा मुंगली याची गोपनीय रित्या माहिती काढून, सापळा लावून त्यास त्याचे राहते घराचे परिसरातून कौशल्याने ताब्यात घेतले.
सदर इसमाकडे केले तपासात त्याने, ०५ में २०२४ रोजी जुळे सोलापूरातील फिर्यादी यांचे बंद घरात दिवसा शिरून चोरी केल्याचे कबूल केले. त्यामुळे त्यास गुन्हयाचे तपासकामी अटक करण्यात आली. गुन्हयाचे तपासात सपोनि दादासो मोरे गुन्हे शाखा, सपोनि एस.एन गायकवाड वि. नाका पो. ठाणे व गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपीकडून एक पाच तोळे वजनाचे सोन्याचे गंठण व एक दिड तोळा वजनाचे नेकलेस असे साडे सहा तोळे वजनाचे किं. रु. ६,२५,०००/- (सहा लाख पंचवीस हजार /-) किंमतीचे दागिने हस्तगत केले आहेत. सपोनि मोरे व त्यांचे तपास पथकाने कौशल्याने व अथक परिश्रमाने गंभीर स्वरुपाचा गुन्हा अल्पावधीतच उघडकीस आणलेला आहे,

सदरची कामगिरी डॉ. एम. राजकुमार, पोलीस आयुक्त सोलापुर शहर, डॉ. दीपाली काळे, पोलीस उपायुक्त गुन्हे, प्रांजली सोनवणे, सहा. पोलीस आयुक्त गुन्हे तसेच सुनिल दोरगे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा यांचे मार्गदर्शनाखाली, गुन्हे शाखेकडील नेमणुकीचे सपोनि श्री. दादासो मोरे, सपोनि एस.एन गायकवाड (वि. नाका पो. ठाणे) व गुन्हे शाखेकडील पोलीस अंमलदार सफी किर्दक, संदीप जावळे, विनोद रजपुत, राजकुमार पवार, इम्रान जमादार, सिध्दाराम देशमुख, अजय गुंड, सतीश काटे यांनी केली आहे.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel