राजकीय

धुळे-सुरत महामार्गावरील विसरवाडी गावाजवळ शेरे पंजाब हॉटेल समोर सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास नवापूर नाशिक एस.टी. बस अन् ट्रकचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात ट्रक चालकाचा मृत्यू झाला असून बसमधील सुमारे 10-12 प्रवासी जखमी झाले आहेत. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, नवापूर आगाराची नवापूर नाशिक बस क्रमांक एम एच 06 एस 8496 सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास नवापूर हून प्रवाश्यांना घेऊन नाशिक जाण्यासाठी निघाली विसरवाडी गावाच्या पुढे महामार्गावर शेरे पंजाब हॉटेल समोर आल्यावर धुळ्याहून नवापूरच्या दिशेने समोरुन येणारी ट्रक क्रमांक टी. एन. 52 ए ए 2613 सोबत बसची समोरासमोर जोरदार धडक झाल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात ट्रक चालक प्रकाश (तामिळनाडू) याचा मृत्यू झाला असून बसमधील सुमारे 10-12 प्रवासी जखमी झाले आहेत. विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात बसमधील प्रवाशांना तात्काळ उपचारासाठी दाखल करून त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून काही गंभीर जखमींना नंदुरबार जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. अपघात एवढा भीषण होता की बस व ट्रकचा समोरासमोरील भाग हा अपघातामुळे चक्काचूर झाला असून बसमधील बहुतेक प्रवासी नवापूर तालुक्यातील असल्याची प्राथमिक माहिती देण्यात आली आहे. तसेच अपघात पाहण्यासाठी महामार्गावर नागरिकांनी मोठी गर्दी केली असून घटनास्थळी विसरवाडी पोलिस ठाण्यातील पोलिस अधिकारी व पोलिस कर्मचारी दाखल झाले होते – अजित पवार

संजय राऊतांनी काल अजित पवारांवर धारदार शब्दांत टीका केली होती. अगदी भूतकाळात अजित पवारांनी केलेले आक्षेपार्ह वक्तव्यही संजय राऊतांनी चव्हाट्यावर आणले होते. मात्र, त्यानंतरही रोखठोक असणाऱ्या अजितदादांनी मात्र संजय राऊतांविरोधात समंजसपणाची भूमिका घेतल्याचे दिसत आहे.

तुम्ही कशाला मनाला लावून घेता?

संजय राऊत हे मोठे नेते आहेत. त्यांचे वक्तव्य मी मनाला लावून घेत नाही. इतरांनी तरी ते कशाला मनाला लावून घ्यावे, अशी प्रतिक्रिया आज अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. तसेच, महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये कोणताही वाद नाही. एक पक्ष म्हणून आम्ही आमची भूमिका मांडत असतो. मात्र, आघाडी म्हणून आम्ही सर्व एक आहोत व आम्ही एकत्रच रहावे, अशी सर्व नेत्यांची इच्छा आहे.

माध्यमांनी काळजी करू नये

नागपूर येथे पत्रकारांनी आज पुन्हा संजय राऊतांनी केलेल्या टीकेवर अजित पवारांची प्रतिक्रिया जाणून घेतली. यावर मीडियालाच उद्देशून अजित पवार म्हणाले, संजय राऊत हे मोठे नेते आहेत. राज्यसभेचे सदस्य आहत. त्यांचे वक्तव्य मीच मनाला लावून घेत नाही, तर तुम्ही तरी कशाला लावून घेता. यावर पत्रकारांनी संजय राऊतांच्या वक्तव्यामुळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते नाराज झाले, असे सांगितले असता अजित पवार तत्काळ उत्तरले, त्या नाराज कार्यकर्त्यांना मी समजावून सांगेल. त्यांची काळजी तुम्ही करू नका.

राऊतांनी काय बोलावे, हे मी कसे सांगणार?

यावेळी संजय राऊतांनी संयम ठेवावा, असे तुम्ही उद्धव ठाकरेंना सांगणार का?, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावर अजित पवार म्हणाले, संजय राऊत हे एका पक्षाचे प्रवक्ते आहेत. एखाद्या पक्षाच्या प्रवक्त्याने काय बोलावे, काय भूमिका मांडावी, हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. त्याबद्दल मी काय बोलणार.

मी खंबीर

दरम्यान, शिंदे गटाचेच प्रवक्ते भरत गोगावले यांनी अजित पवार युतीत येण्याच्या तयारीत आहेत, असे वक्तव्य केले. त्यावर अजित पवार म्हणाले, मी कुठे जाणार, कुठे नाही, हे सांगायला मी खंबीर आहे ना. दुसऱ्यांनी माझे वकीलपत्र घेण्याची आवश्यकता नाही. स्थापना झाल्यापासून मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहे व यापुढेही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच राहणार आहे. अजित पवारांचे नाव घेतल्यावर बातमी बनते, त्यामुळे काही लोक माझे नाव घेतात, असा टोलाही अजित पवारांनी लगावला.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel