सोलापूर बातमीमहाराष्ट्रसोलापूर सामाजिक

नगरसेवक पै. सद्दाम शेरीकर मित्रपरिवार तर्फे आयोजित केलेल्या दावत ए इफ्तार’ पार्टीला उत्स्फूर्त प्रतिसाद…

पवित्र रमजान महिन्याचे औचित्य साधून नगरसेवक तथा बांधकाम सभापती पै.सद्दाम शेरीकर, एस.एम.सोशल ग्रुप पंच तालीम अक्कलकोट मित्र परिवाराच्या वतीने सालाबादप्रमाणे पवित्र रमजान महिन्याचे मुस्लिम समाजाच्या पवित्र रमजान निमित्ताने रोजा दावते इफ्तार पार्टीचे भव्य आयोजन करण्यात आले होते.
रमजान महिन्याच्या निमित्ताने रोजदार बांधवांसाठी २२ मार्च २०२५ शनिवार रोजी सायंकाळी ६:४० ला आरीफ शेरीकर चौक, मक्का मस्जिद अक्कलकोट येथे करण्यात आले होते आयोजित केलेल्या रोजा ‘दावत ए इफ्तार’ला हिंदू-मुस्लिम बांधवांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
माजी गृहराज्यमंत्री सिद्धारामजी म्हेत्रे साहेब श्री स्वामी समर्थ अन्नछत्र चे विश्वस्त अमोलराजे भोसले,तम्मामामा शेळके, मराठा समाज संघर्ष समिती अध्यक्ष मा.सुरेशचंद्र सूर्यवंशी (वकील काका), दिलीप भाऊ सिद्धे यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘ दावत ए इफ्तार’ पार्टी संपन्न झाली.

रोजा दावते इफ्तार पार्टीला मुस्लिम बांधवांसोबत हिंदू बांधवही उपस्थित होते नगरसेवक सद्दाम शेरीकर मित्र परिवाराच्या या ‘दावते इफ्तार’ पार्टीत हिंदू-मुस्लिम समाजातील एक्ये पुन्हा एकदा दिसून आले.
माझी गृहराज्यमंत्री सिद्धारामजी महेत्रे साहेब यांनी सर्व मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.
रोजा दावते इफ्त्यार पार्टीला अक्कलकोट शहर व परिसरातील नागरिक सहभागी झाले होते.
सर्व मुस्लिम बांधवांचे स्वागत पै.सद्दाम शेरीकर व एस.एम.सोशल ग्रुप पंच तालीम अक्कलकोट यांनी केले.
या वेळी माझी गृहराज्यमंत्री सिद्धारामजी महेत्रे साहेब श्री स्वामी समर्थ अन्नक्षत्रचे विश्वस्त अमोलराजे भोसले, राजेंद्र टाकने (PI),निलेश भागव(API),हजरत मस्तुर शाह कादरी, काका पाटिल,महेश हिंडोळे,दिलीप भाऊ सिद्धे, निखिल पाटिल,गोटु माने,प्रवीण घाटगे, शिवराज स्वामी,शाकीर पटेल, गुलाबसाब तडमुड, सुनील सिध्दे,शिकुर शेख, इरफान दावना, कोरबु सर,लखन झंपले,सलीम यळसंगी
पत्रकार मारुती बावडे,स्वामिराव गायकवाड,योगेश कबाडे,नंदकुमार जगदाळे,दयानंद दनुरे,राजेश जगताप,रमेश भंडारे, व मान्यवर पदाधिकारी व एस एस सोशल ग्रुप चे सर्व कार्यकर्ते व मुस्लीम बांधव उपस्थित होते.
सद्दाम शेरीकर व एस एस सोशल ग्रुप पंच तालीम अक्कलकोट मित्रपरिवार यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel