राजकीय

नव्या संसदेच्या उद्घाटनाचे निमंत्रण व्हॉट्सअ‌ॅपवर आले- सुप्रिया सुळे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नव्या संसदेचे लोकार्पण करण्यात आले. मात्र, जुन्या संसदेच्या भिंतीही बोलक्या आहेत. तेथे महान लोकांनी बसून इतिहास घडवलेला आहे. त्यामुळे माझ्यासाठी जुने संसदच लोकशाहीचे मंदिर आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

तीन दिवसांपूर्वी केवळ एक मेसेज

अनेकवेळा सर्वोत्तम संसदपटू ठरलेल्या सुप्रिया सुळे आज नव्या संसदेच्या उद्घाटन सोहळ्याला का गेल्या नाहीत? तुम्हाला या कार्यक्रमाचे निमंत्रण नव्हते का?, असा प्रश्न आज सुप्रिया सुळे यांना पत्रकारांनी विचारला. त्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, तीन दिवसांपूर्वी मला फक्त एक व्हॉट्सअ‍ॅप मेसेज आला होता संसदीय कमिटी मेंबर म्हणून या सोहळ्याला उपस्थित राहण्याबाबत तो मेसेज होता.

एक फोन केला असता तर…

सुप्रिया सुळे म्हणाल्या, संसद चालवण्याची जबाबदारी ही सत्ताधाऱ्यांची असते. संसदेत जेव्हा काही बिले पास करायची असतात किंवा सत्ताधाऱ्यांचे इतर काही कार्यक्रम असतात तेव्हा केंद्रातील मंत्री नेत्यांना, विरोधकांना फोन करतात. .परंतु आजच्या कार्यक्रमाला बोलावण्यासाठी कोणाचाही फोन आला नाही. या सरकारमधल्या वरिष्ठ नेत्यांनी, मंत्र्यांनी सर्व विरोधी पक्षांना एक फोन केला असता तरी आम्ही सर्वजण राजीखुशीने या कार्यक्रमालो गेलो असतो. आपली संसद हे लोकशाहीचं मंदिर आहे. आम्ही सर्व पक्ष एकत्र आलो असतो तर ते देशासाठी जास्त संयुक्तिक वाटले असते.

नव्या संसदेत राज्यसभा नाही का?

सुप्रिया सुळे म्हणाल्या, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना एवढ्या महत्त्वाच्या कार्यक्रमाचे साधे निमंत्रणही देण्यात आले नव्हते. तसेच, आजच्या सोहळ्यात केवळ लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्लाच दिसले. नव्या संसद भवनात राज्यभा नाही का? उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे अध्यक्ष असतात. उपराष्ट्रपतींनाही कार्यक्रमाला बोलावले नाही. या सरकारने राज्यसभेला हद्दपारच केले आपल्या देशात राज्यसभा आहे की नाही? या कार्यक्रमाला उपराष्ट्रपतींना बोलवायला हवे होते. परंतु हा कार्यक्रम एका व्यक्तिचा आहे की, देशाचा तेच कळत नाही.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel