टिप्परला अडकली स्कुटी, मुलगा 2KM फरफटत गेला, VIDEO:लोक ओरडले, पण टिप्पर थांबले नाही; आजोबा-नातवाचा मृत्यू

उत्तर प्रदेशच्या महोबामध्ये एक हृदयद्रावक घडली आहे. त्यात एका टिप्परने आजोबा व नातवाला चिरडले आहे. शनिवारी कानपूर सागर हायवेवर वेगाने जाणाऱ्या एका टिप्परने स्कूटीला धडक दिली. त्यात वृद्धाचा जागीच मृत्यू झाला. तर 6 वर्षीय नातू टिप्परच्या पुढील भागात स्कूटीसह अडकला. टिप्पर चालकाने या मुलाला स्कुटीसह तब्बल 2 किलोमीटरपर्यंत फरफटत नेले.
हे दृश्य पाहून आसपासच्या लोकांनी दुचाकीने टिप्पर चालकाचा पाठलाग केला. ते ओरडून त्याला टिप्पर थांबवण्यास सांगत होते. पण टिप्परचा वेग एवढा जास्त होता की रस्त्यावरून ठिणग्या उडत होत्या. या घटनेचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.
नातवासोबत घराबाहेर गेले होते रिटायर्ड शिक्षक
यासंबंधीच्या वृत्तानुसार, हमीरपूर चुंगीलगत राहणारे सेवानिवृत्त शिक्षक उदित नारायण (67) आपल्या 6 वर्षीय नातवाला स्कुटीवरून सैरसपाटा मारण्यासाठी घराबाहेर पडले होते. तेव्हा महोबाहून कबरईकडे जाणाऱ्या वेगवान टिप्परने त्यांच्या स्कुटीला धडक दिली.
या अपघातात उदित नारायण यांचा मृत्यू झाला. तर स्कुटीसह नातू सात्विक टिप्परखाली अडकला. जवळपास 2 किमीपर्यंत तो टिप्परसोबत फरफटत गेला. लोकांनी पाठलाग करून टिप्पर थांबवेपर्यंत सात्विकच्या मृतदेहाच्या चिंथड्या उडाल्या होत्या.
दगडफेकीनंतर टिप्पर थांबवले
अपघातानंतर स्थानिकांनी टिप्पर थांबवण्याचा खूप प्रयत्न केला. पण चालकाने त्याकडे दुर्लक्ष करत टिप्पर तसाच पळवला. त्यामुळे लोकांनी त्याच्यावर दगडफेक केली. त्यानंतर चालकाने टिप्पर थांबवले. त्यानंतर त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. पण जवळपास 500 मीटर पाठलाग केल्यानंतर त्याला पकडण्यात आले. स्थानिकांनी त्याला चांगलाच चोप दिला. त्यानंतर त्याला पोलिसांच्या स्वाधिन करण्यात आले.

ड्रायव्हर म्हणाला – स्कुटी व मुलगा अडकल्याचे माहिती नव्हते
अपघातानंतर भीतीपोटी टिप्पर चालकाने वाहन थांबवले नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्याला नागरिकांच्या मारहाणीची भीती वाटत होती. त्याने सांगितले की, आरडाओरड व दगडफेक केल्यानंतर टिप्पर थांबले, तेव्हा स्कूटीसह निष्पाप अडकल्याची माहिती मिळाली.
चालक कानपूरचा
या अपघाताची माहिती मिळताच एसडीएम सदर जितेंद्र कुमार, सीओ सिटी रामप्रवेश राय यांच्यासह शहर कोतवाली पोलिस घटनास्थळी पोहोचले. दोघांचे मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले. राम बहादूर असे आरोपी चालकाचे नाव आहे. तो कानपूरच्या संडौली गावचा आहे.