महाराष्ट्र

पती-पत्नीच्या वादाचा इन्स्टाग्राम मित्राने उठविला गैरफायदा; लग्नाचे आमिष दाखवले, लाॅजवर नेऊन अत्याचार

पती व पत्नीमध्ये वाद झाल्यानंतर इन्स्टाग्रामवर ओळख झालेल्या मित्राने विविध ठिकाणी नेऊन तरुणीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना साताऱ्यात उघडकीस आली.

याप्रकरणी एका तरुणावर सातारा शहर पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे.

अजित सदाशिव बागल (वय २६, रा. लिंब गोवे, ता. सातारा) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पीडित विवाहित तरुणी २३ वर्षांची असून, पती-पत्नीमध्ये वाद होत होते. यावेळी पीडितेची इन्स्टाग्रामवर अजित बागलशी ओळख झाली. त्याने पीडित तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून सातारा शहरातील विविध ठिकाणी लाॅजवर नेऊन बलात्कार केला. २०२० ते दि. २८ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत हा प्रकार घडला आहे. पीडितेने लग्नाचे विचारले असता त्याने लग्नास नकार दिला. यानंतर पीडित विवाहित तरुणीने सातारा शहर पोलिस ठाण्यात त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली. सहायक पोलिस निरीक्षक मते हे अधिक तपास करीत आहेत.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

betkom giris

Proda Login