शैक्षणिकसोलापूर बातमी

सोलापूर शहरातील ब्रिज मोहन फोफलियाज आयडील इंग्लिश मीडियम शाळेचा 15 वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा…

सोलापूर शहरातील ब्रिज मोहन फोफलियाज आयडील इंग्लिश मीडियम शाळेचा 15 वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. कार्यक्रमाची सुरुवात स्वर्गीय चंद्राम गुरुजी आणि स्वर्गीय मोहन चव्हाण यांच्या प्रतिमेला अभिवादन करून झाली. यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून ब्रिजमोहन फोफलियाज उपस्थित होते.
शाळेने 15 वर्षे यशस्वीपणे पूर्ण केली असून, अध्यक्ष सचिन चव्हाण आणि सचिव ज्योती चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली शाळा उत्कृष्टपणे चालवली जात आहे.या शाळेची शतकांपर्यंत प्रगती होवो अशी इच्छा प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले फोफलियाज यांनी व्यक्त केली आणि स्वर्गीय चंद्राम गुरुजींच्या आठवणींना उजाळा देत सचिन ज्योती चव्हाण दांपत्याला शुभेच्छा व आशीर्वाद दिले. गेल्या तीन वर्षांपासून शाळेचा निकाल 100% लागत असून, याचे श्रेय सचिवा ज्योती चव्हाण आणि शिक्षकांना देत, विद्यार्थ्यांना उत्तम नागरिक बनवण्यावर भर देण्याचे आवाहन संस्थेचे अध्यक्ष सचिन चव्हाण यांनी केले. यावेळी त्यांनी स्वामी विवेकानंद यांची प्रेरणादायी कथा सांगितली तसेच उत्तीर्ण विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
वर्धापन दिनानिमित्त दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा ट्रॉफी, प्रमाणपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कारही करण्यात आला. कार्यक्रमाला विद्यार्थी, पालक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. गुणवंत विद्यार्थ्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या. हा सोहळा जल्लोषात आणि उत्साहात पार पडला.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel