सोलापूर क्राईमsolapurpoliceUncotigorized5क्राईमजिल्हाधिकारी कार्यालय सोलापूरलोकसभा बातमी 2024सोलापूर बातमीसोलापूर सामाजिक

मोटार सायकल चोरीचे ०४ गुन्हे उघडकीस, शहर गुन्हे शाखेची कामगिरी…

सोलापूर शहरामधील मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणणे बाबत मा. श्री. एम. राज कुमार, पोलीस आयुक्त सोलापूर शहर, डॉ. दीपाली काळे, पोलीस उप आयुका, गुन्हे, श्री. राजन माने, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे, सोलापूर शहर, यांनी गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना मार्गदर्शन केले होते. दि. ०५/०४/२०२५ रोजी पोसई/मुकेश गायकवाड यांचे पथक पोलीस आयुक्तालयात गस्त करीत असताना, एक इसम चोरीची मोटार सायकल घेऊन न्यू धोंडीबा वस्ती, रामवाडी हॉस्पीटल रोड आतमध्ये बोळात थांबला असल्याची गोपनिय माहिती प्राप्त झाली. त्यामुळे, मिळालेल्या बातमीप्रमाणे इसम नामे मच्छींद्र उर्फ बापू गोरख गायकवाड वय ३२ वर्षे, व्यवसाय मजुरी, राहणार न्यू धोंडीबा वस्ती, रामवाडी, सोलापूर यास ताब्यात घेतले. त्यानंतर, त्याचेकडे चौकशी केली असता, त्याने, त्याच्या घरासमोर लावलेल्या १) एक हिरो एच एफ डिलक्स कंपनीची मोटार सायकल विना नंबर प्लेट चेसीस क. MBLHA11ALESH24239 इंजीन के. MA11EJESH09384 असा असलेली, २) एक हिरो एच एफ डिलक्स कंपनीची मोटार सायकल विना नंबर प्लेट चेसीस क्र. MBLHA11ATFQJ43787व इंजिन क्र. HA11EJFQJ47653 असा असलेली, ३) एक हिरो एच एफ डिलक्स कंपनीची मोटार सायकल विना नंबर प्लेट चेसीस क्र. MBLHAR236JHG05254 व इंजिन क्र. HA11ENJHG07499 असा असलेली ४) एक हिरो एच एफ डिलक्स कंपनीची मोटार सायकल विना नंबर प्लेट चेसीस क्र. MBLHA11AEE9000797 व इंजिन क्र. HA11EF E0003008 अशा चोरीच्या ०४ मोटार सायकली काढुन दिल्या. त्या मोटार सायकल बाबत, त्याच्याकडे चौकशी केली असता, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणुक २०२४ या वेळी रात्री एम्प्लायमेंट चौक सोलापूर येथून ०१, रेल्वे स्टेशन पार्कीग येथुन ०१. फॉरेस्ट रेल्वे लाईन येथुन ०१, पारशी विहीर कुमठा नाका येथुन ०१ अशा एकुण ०४ मोटार सायकल चोरी केल्या असल्याचे त्याने माहिती दिली. वर नमुद ०४ मोटार सायकलचे इंजिन व चेसिस नंबरची पडताळणी केली असता, सदर वाहनाबाबत सदर बझार पोलीस ठाणे व एम.आय.डी.सी. पोलीस ठाणे येथे दाखल असलेले खालील गुन्हयातील ९०,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करुन ०४ गुन्हे उघडकीस आले आहेत.

सदरची कामगिरी मा. श्री. एम. राज कुमार, पोलीस आयुक्त सोलापूर शहर, डॉ. दीपाली काळे, पोलीस उप आयुक्त, गुन्हे, श्री. राजन माने, सहा. पोलीस आयुक्त, श्री. सुनिल दोरगे, व.पो.नि., गुन्हे शाखा, यांचे मार्गदर्शनाखाली, पोसई/ मुकेश गायकवाड, पोलीस अंमलदार नंदराम गायकवाड, वाजीद पटेल, योगेश बर्डे, संजय साळुंखे, सिध्दाराम देशमुख, अजय गुंड यांनी केली आहे.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel