सोलापूर बातमीदेश - विदेशमहाराष्ट्रशैक्षणिक

सोलापूर शहर अंतर्गत पोलीस काका व पोलीस दिदी हा उपक्रम प्रभावीपणे राबविण्याकरीता पोलीस आयुक्त M राजकुमार यांचे अध्यक्षतेखाली मिटींग आयोजीत करण्यात आली होती….

पोलीस आयुक्तालय सोलापूर शहर अंतर्गत पोलीस काका व पोलीस दिदी हा उपक्रम प्रभावीपणे राबविण्याकरीता मा. पोलीस आयुक्त श्री एम. राजकुमार यांचे अध्यक्षतेखाली आज दिनांक ३१/०८/२०२४ रोजी मिटींग आयोजीत करण्यात आली होती. सदर मिटींग करीता सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री राजन माने तसेच पोलीस ठाणेकडील पोलीस काका व पोलीस दिदी या उपक्रमांकरीता नेमण्यात आलेले ०८ पोलीस अधिकारी व २३ अंमलदार हजर होते.

सदर मिटींग करीता पोलीस आयुक्त यांनी उपस्थित असलेले अधिकारी व अमलदार यांना शाळेतील मुलांमध्ये पोलीसांबाबत विश्वास निर्माण करून पोलीस हे आपल्या सुरक्षिततेसाठी असतात हे जाणीव करुन देण्यास सांगितले. तसेच शाळेत मेटी दरम्यान शाळेतील सर्व शिपाई तसेच शाळेतील सीसीटीव्ही, कॅमेरा, शाळेचे सुरक्षिततेबाबतचे काय उपाय योजना आहेत याबाबतची माहिती घेण्यास सांगितले. तसेच शिक्षक व शाळेतील इतर कर्मचारी, शिपाई यांची माहिती व आधारकार्डची माहिती ठेवण्यास सांगितले, शाळेतील मुलांचे सुरक्षेकरीता गार्ड नेमणेकरीता शाळांना सुचना देण्यास सांगितले. तसेच मिटींग करीता उपस्थित असलेले स.पो.आ.राजन माने यांनी उपस्थितांना सदरचा उपक्रम हा यशस्वी करण्याकरीता प्रोत्साहन दिले. तसेच शाळेतील शिपाई वर्ग हे चांगल्या वर्तणुकीचे नेमण्यास शाळेला सुचना देण्यात यावे असे सांगितले, त्याचप्रमाणे शाळेतील मुलांच्या पालकांमध्ये देखील सदर उपक्रमाची जनजागृती करायला सांगितले.

सदर मिटींग करीता उपस्थित असलेल्या अधिकारी व अंमलदारांना पोलीस उप निरीक्षक संजीवनी व्हड्डे यांनी पोलीस काका व पोलीस दिदी या उपक्रमांचे प्रशिक्षण दिले. तसेच उपस्थितांना Good Touch/Bad Touch बाबतचे व्हिडीओ दाखविण्यात आले. सदर मिटींगचे सुत्रसंचालन पोसई. करुणा बौगुले यांनी केले व आभार प्रदर्शन सपोनि. स्वाती येळे यांनी केले…

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel