सोलापूर बातमीमहाराष्ट्रशैक्षणिकसोलापूर सामाजिक

प्रदेशाध्यक्ष बापूसाहेब आडसूळ यांना दिल्ली येथे कुलगुरू डॉ हिंदूभूषण मिश्राजी यांच्या शुभहस्ते पीएचडी प्रधान…

भारत सरकार मान्यता प्राप्त दीनदयाल हिंदी विद्यापीठ यांच्यामार्फत शैक्षणिक व सामाजिक योगदान या विषयांमध्ये बापूसाहेब आडसूळ सदस्य मंत्रालय समन्वय समिती मुंबई,प्रदेशाध्यक्ष स्वाभिमानी शिक्षक व कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्य यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये सर्वात महत्वपूर्ण समजली जाणारी PhD पदवी दीनदयाल हिंदी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंदूभूषण मिश्राजी, यांचे शुभहस्ते दिल्ली येथे संपन्न झाली यावेळी पद्मभूषण डॉ.अरविंद कुमारजी, पूर्व कुलगुरू राणी लक्ष्मीबाई केंद्रीय कृषी विद्यालय झाशी, डॉ.सुवर्णलता पांचालजी,दिल्ली, महाराष्ट्र समन्वयक डॉ.एस प्रकाशजी, डॉ. शिवाजी शिंदे इत्यादी मान्यवर प्रमुख उपस्थित होते
बापूसाहेब आडसूळ यांनी शिक्षक,मुख्याध्यापक ते मंत्रालय, शिक्षक संघटना या माध्यमातून भरीव असं कार्य केले असून त्यांचे शिक्षण चार विषयांमध्ये M A असून Bed,Bped,Med D.S.M असून ते गेले 18 वर्ष झाले शैक्षणिक सामाजिक कार्यरत अग्रेसर असून त्यांनी कोल्हापूर विद्यापीठ,सोलापूर विद्यापीठ,पुणे विद्यापीठ,नाशिक विद्यापीठ,मुंबई विद्यापीठ या विद्यापीठाच्या माध्यमातून सर्व शिक्षण पूर्ण करून एक नावलौकिक केलेला आहे या सर्व बाबींचा विचार होऊन बापूसाहेब आडसुळ यांना शिक्षण क्षेत्रात सर्वात मानाची आणि महत्त्वपूर्ण असणारी PhD पदवी कुलगुरूंच्या हस्ते दिल्ली येथे प्रदान करण्यात आली याबद्दल बापूसाहेब आडसुळ यांचे सोलापूर जिल्हा बरोबर राज्यांमधून सर्व स्तरांमधून विशेष कौतुक आणि अभिनंदन करून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
या यशाबद्दल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे, राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपकजी केसरकर,शिवसेना जिल्हाप्रमुख सोलापूर मनीष काळजे, पुणे बोर्डाचे सचिव औदुंबर उकिरडे ,पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक राजेंद्र अहिरे, राज्यातील विविध संस्थेचे प्रमुख पदाधिकारी व अधिकारी, मंत्रालयामधील अधिकारी यांनी अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel