सोलापूर बातमीमहाराष्ट्रसोलापूर सामाजिक

विद्यार्थ्यानी ज्ञान मिळविण्यासाठी कठोर परिश्रमाची तयारी ठेवावी – योगीराज वाघमारे

डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे आजन्म विद्यार्थी होते. त्यांनी कधीही आपल्या परिस्थितिचे कारण न सांगता ज्ञान मिळविले आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ज्ञांना मुळेच आज भारतीय संविधान हे जगात सर्वश्रेष्ठ संविधान म्हणून ओळखले जाते. असे उदगार ज्येष्ठ साहित्यिक, निवृत्त शिक्षणाधिकारी योगिराज वाघमारे यांनी काढले. ते अक्कलकोट रोड सोलापूर येथील सदसंकल्प शिक्षण समुहाच्या राष्ट्रसंत प्राथमिक शाळा आणि विश्वभूषण विद्यालय येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक सचिव समाजभूषण अण्णासाहेब भालशंकर हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा शिवाजी बनसोडे हे होते.
कार्यक्रमाच्या सुरवातीस डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. पुढे बोलताना योगिराज वाघमारे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक, शैक्षणिक, कायदेविषयक, अर्थशास्त्र, इ. कार्यावर प्रकाश टाकला. यावेळी समाजभूषण अण्णासाहेब भालशंकर यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्याची सखोल माहिती सांगितली. यावेळी प्रा.शिवाजी बनसोडे, राष्ट्रसंत प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका मंजुश्री खंडागळे, विश्वभूषण विद्यालयचे मुख्याध्यापक सत्यवान पाचकुडवे हे उपस्थित होते. शाळेच्या एका विद्यार्थ्यांने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका साकारली होती,। यावेळी शाळेतील विद्यार्थी, शिक्षक यांनी आपली मनोगते व्यक्त केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संतोष वाघमारे यांनी केले, तर सूत्रसंचालन प्रवीण पाटील यांनी केले. शेवटी सत्यवान पाचकुडवे यांनी सर्वांचे आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रसंत प्राथमिक शाळा आणि विश्वभूषण विद्यालयाचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.
फोटोओळी :- डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दीनानिम्मत डॉ.बाबासाहेब आंबेडकर याच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करतेवेळी ज्येष्ठ साहित्यिक योगिराज वाघमारे, अण्णासाहेब भालशंकर, शिवाजी बनसोडे, सत्यवान पाचकुडवे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या वेशभूषेतील विद्यार्थी दिसत आहे.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

betkom giris

Proda Login