प्राण घातक हल्ला केल्याप्रकरणी दोघास कारावासाची शिक्षा…
सोलापूर दिनांक: जहांगीर लालसाब सिंदगीकर राहणार सोलापूर सह तिघांवर प्राणघात हल्ला केल्या प्रकरणी बंदगी हुसेनसाब सिंदगीकर वय 36 राहणार सिद्धेश्वर पेठ व महबूब शब्बीर बागवान वय 35 राहणार मजरेवाडी यांच्यावर भरलेल्या खटल्याची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश रेखा पांढरे यांच्यासमोर होऊन त्यांनी दोघा आरोपींना सहा महिन्याच्या कारावासाची शिक्षा ठोठावली.
यात हकीकत अशी की दिनांक 14/09/2021 रोजी अबुताला जहांगीर सिंगीकर हा त्याच्या फर्निचरच्या दुकानात बसला असता संध्याकाळी 5:30 च्या सुमारास मागील भांडणाचा रोष मनात धरून आरोपी बंदगी व मेहबूब हे दोघे त्याच्या दुकानासमोर आले व त्यास शिवगाळ करू लागले त्यावेळी अबुतालाचा मोठा भाऊ अबूबकर हा तेथे आला असता त्यास ही दोघे आरोपी शिवगाळ करू लागले .त्यावेळी आरोपी बंदगी हा अबुतालाच्या वडिलांना उद्देशून ” जहांगीरया बहारा आ तुझे दिखाता “असे म्हणत होता त्यावेळी जहांगीर बाहेर आल्यावर त्याच लोखंडी रॉडने डोक्यावर मारहाण केली तसेच अबुताला ,अबूबकर यांनाही मारहाण केली अशा आशयाची फिर्याद अबुताला जहांगीर सिंगीकर यांनी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात दिली होती.
पोलिसांनी तपास करून आरोपींन विरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले होते.
खटल्यात सरकार तर्फे जखमी, नेत्र ,डॉक्टर यांच्यासह एकंदर सात साक्षीदार तपासण्यात आले
खटल्याच्या सुनावणीच्या वेळेस जखमी साक्षीदार ,नेत्र साक्षीदार वैद्यकीय अधिकारी यांच्या झालेल्या साक्षी या जखमेशी व घटनेशी सुसंगत असल्याचा युक्तिवाद मांडला. त्यावरून न्यायाधीशांनी दोन्ही आरोपींना सहा महिन्याच्या कारावासाची व दोनशे रुपये दंडाची शिक्षा ठोठावली तसेच जखमींना प्रत्येकी 5000 रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले.
यात सरकारतर्फे ऍड.अल्पना कुलकर्णी तर मूळ फिर्यादीतर्फे ऍड. मिलिंद थोबडे ऍड.सतीश शेटे यांनी तर आरोपीतर्फे ऍड. एम ए इनामदार यांनी काम पाहिले.