सोलापूर बातमीSolapur court matterन्यायालय निर्णयसोलापूर क्राईम

शिक्षण विभागातील वरिष्ठ सहाय्यकास ४० हजारांची लाचेची मागणी केल्याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालय सोलापूर येथुन जामीन मंजूर….

२४ वर्षांची सेवा पूर्ण झाल्यानंतर निवड श्रेणी मान्यतेसाठी २० हजार रुपयांची लाच स्वीकारल्याबद्दल अटक केलेल्या जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागातील वरिष्ठ सहाय्यक घनश्याम मस्के यांना विशेष न्यायाधीश आर. जे. कटारिया यांनी सशर्त जामीन मंजूर केला आहे.आरोपी घनश्याम अंकुश मस्के (वय.४३ रा.मरगू अपार्टमेंट यशवंत मिल, अक्कलकोट रोड सोलापूर) यांनी तक्रारदार शिक्षक सौदागर अभिमन्यू गव्हाणे यांच्याकडून निवड श्रेणीच्या प्रस्ताव मान्यतेसाठी एकूण ४० हजार रुपयांची मागणी केली होती. तसेच, त्यांनी यापूर्वी प्रस्ताव मंजुरीसाठी प्रासंगिक ५,००० रुपये स्वीकारल्याचा आरोप होता. त्यानंतर काम पूर्ण करण्यासाठी राहिलेले ३०,००० रुपयांची पुढील मागणी केल्याचा आरोप तक्रारदार शिक्षकांनी केला होता. फिर्यादीच्या तक्रारीनुसार सोलापूर लाचलुचपत विभागाने कारवाई करत आरोपी मस्के यांना ठरल्याप्रमाणे सुरुवातीलाच २०,००० रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले होते .त्यानंतर आरोपीला जिल्हा व सत्र न्यायालय, सोलापूर येथे हजर करण्यात आले.आरोपीने मे.जिल्हा व सत्र न्यायालय, सोलापूर येथे जामीन अर्ज दाखल केला होता. आरोपीच्या वकिलांनी सादर केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीचा जामीन मंजूर केला आहे.या प्रकरणात आरोपीतर्फे ॲड. कदीर औटी, ॲड. सोमनिंग पुजारी, ॲड. अभिषेक देवकते, ॲड. दत्तात्रेय कापुरे, ॲड. वैभव बोंगे, ॲड. ओंकार फडतरे यांनी काम पाहिले.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

betkom giris

Proda Login