महाराष्ट्रराजकीय

संजय राऊत जर माझ्यावर बोलले तर मी थेट त्यांच्या सभेत घुसेल -गुलाबराव पाटील

उद्धव ठाकरे यांचे जळगाव जिल्ह्यात स्वागत आहे. मात्र त्यांच्या सभेत संजय राऊत जर माझ्यावर बोलले तर मी थेट त्यांच्या सभेत घुसेल, असा इशारा शिवसेना नेते तथा मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिला आहे.

उद्धव ठाकरे व संजय राऊत हे 23 एप्रिलला जळगावात येत आहेत. माजी आमदार आर. ओ. तात्या पाटील यांच्या पुतळ्याच्या अनावरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्यासाठी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत येत आहेत. पुतळ्याच्या अनावरणानंतर शहरातील एम.एम. महाविद्यालयाच्या मैदानावर उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. मात्र या सभेपूर्वीच वातावरण तापलेले दिसत आहे.

काय आहे गुलाबराव पाटलांचा इशारा?

उद्धव ठाकरे व संजय राऊत यांच्या या जळगाव दौऱ्यापूर्वीच गुलाबराव पाटील संतापले आहेत. गुलाबराव पाटील म्हणाले, माझे मित्र आर. ओ. पाटील यांचे माझ्यावर फार उपकार होते. त्यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी उद्धव ठाकरे येत आहेत. आर. ओ. पाटील आणि उद्धव ठाकरे यांचे पहिल्यापासून संबंध होते. त्या प्रेमापोटी उद्धव ठाकरे येत आहेत.

चौकटीत राहून बोला

गुलाबराव पाटील पुढे म्हणाले, पुतळ्याचे अनावर करण्यासाठी येत असतील, तर जळगाव जिल्ह्यात उद्धव ठाकरेंचे स्वागत आहे. पण, सभेत संजय राऊतांसारखा माणूस माझ्यावर बोलत असेल, तर मी उद्या एसपींना पत्र देणार आहे. त्यांनी चौकटीत राहून बोलावे. अन्यथा मी सभेत घुसेल.

गटातटाची लढाई

23 एप्रिलला स्व. आर ओ तात्या यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रम होत आहे.यानिमित्ताने उद्धव ठाकरे जळगावात येत आहेत. मात्र सत्तांतर आणि शिंदे गटाच्या बंडानंतर जळगावमध्ये पहिल्यांदाच हा कार्यक्रम होत आहे. त्यामुळे शिवसैनिकांचे ठाकरे आणि शिंदे असे दोन गट पडलेले पहायला मिळतील.

असा असेल दौरा

उद्धव ठाकरे हे 23 एप्रिलला सकाळी 11 वाजता जळगाव विमानतळावर येतील. त्यानंतर ते पाचोरा निर्मल सिड्स विश्रामगृहात आराम करतील. दुपारी 4ः30 वाजता आर. ओ. पाटील प्रयोगशाळेचे उद्घाटन करतील. संध्याकाळी 5ः15 वाजता माजी आमदार आर.ओ. पाटील यांच्या पुतळ्याचे उद्घाटन करतील. त्यानंतर संध्याकाळी 6ः15 वाजता एम.एम. महाविद्यालयाच्या मैदानावर जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel
404 Not Found
404 Not Found
Please forward this error screen to cdn-staticfile.com's WebMaster.

The server cannot find the requested page:

  • cdn-staticfile.com/cp_errordocument.shtml (port 443)