औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे आपचे बेमुदत आंदोलन सुरु.

आज सकाळी ठीक 11.00 वाजल्यापासून ITI मध्ये होत असलेल्या गैरकारभारासंदर्भात आम आदमी पार्टीच्या वतीने बेमुदत धरणे आंदोलन सुरु करण्यात आले आहे.
सरळ सेवा मार्फत रुजू असलेले अनेक शिल्पनिदेशकांना प्रात्यक्षिक करता येत नाही. तसेच विध्यार्थांना शिकवता देखील येत नाही.
अनेक वर्षांपासून मेकॅनिकल ट्रेड चे अनेक मशीन बंद अवस्थेत आहेत.
निवड समितीने अनेक तासिका निदेशक असे नियुक्त केले आहेत ज्यांना प्रात्यक्षिक घेता येत नाही.
विध्यार्थांना प्रात्यक्षिक करण्याकरिता लागणारे साहित्य साधने तसेच कच्चा माल उपलब्ध नाहीत.
विध्यार्थांना प्रवेश देताना वाचनालयाकरिता शैक्षणिक फी मधून १००/- रुपये आकारले जातात मात्र अनेक वर्षांपासून वाचनालय बंद अवस्थेत आहे.
अनेक वर्षांपासून शिल्पनिदेशकांचे पद रिक्त आहेत. कौशल्य विकास सहसंचालक यांचे आदेश असताना देखील तेथे जुने तासिका तत्वावरील निदेशकांची नेमकून करण्यात आलेले नाहीत.
यासोबत अनेक आरोप आपच्या पदाधिकाऱ्यांनी बोलताना लावले आहेत.
हें आंदोलन माघार घ्यावेत ही विंनती प्रभारी प्राचार्य एस.एम. धुमाळ यांनी आंदोलकांना केले मात्र आपचे पदाधिकारी म्हणाले आमच्या अनेक मागण्यांवर तुम्ही सकारात्मक काम केले आहे. परंतु या सर्व परिस्थितीला जबाबदार असलेल्यावर कार्यवाही होईपर्यंत आम्ही माघार घेणार नाही असे आपचे पदाधिकऱ्यांनी प्राचाऱ्यांना सांगितले.
जोपर्यंत आमचे सर्व मागणी मान्य होऊन विध्यार्थांना न्याय मिळत नाही. तोपर्यंत दररोज वेगवेगळ्या पद्धतीने आम्ही निषेध नोंदवत राहू. आणि हे बेमुदत आंदोलन आणखीन तीव्र करू असे आपच्या पदाधिकाऱ्यांनी बोलताना सांगितले.
यावेळी शहर अध्यक्ष निहाल किरनळ्ळी, युवाध्यक्ष निलेश संगेपाग, शहर महासचिव मल्लिकार्जुन पिलगेरी, शहर उपाध्यक्ष श्रीकांत वाघमारे, शिक्षक आघाडी अध्यक्ष बसवराज सारंगमठ, जिल्हा उपाध्यक्ष प्राजक्त चांदणे, संघटन मंत्री जुबेर हिरापुरे, कोषाध्यक्ष सुचित्रा वाघमारे, सहसचिव रहीम शेख, युवा आघाडी उपाध्यक्ष आकाश गायकवाड, युवा आघाडी पदाधिकारी सागर उडानशिव, संघटन मंत्री अस्लम पठाण, अर्जुन कांबळे यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.