सुशीलकुमार शिंदे आणि प्रणिती शिंदेंचा कौमी एकता मंचला ठेंगा
सोलापुरातील मुसलमानांची कौमी एकता मंच दिशाभूल करतेय का?

सोलापूर शहरातील मध्य विधानसभेच्या जागेवर महाविकास आघाडीने किंवा काँग्रेसने मुस्लिम उमेदवार द्यावा यासाठी काँग्रेसमधील नेत्यांनी एकत्रित येत कौमी एकता मंच स्थापन केले आहे.कौमी एकता मंच मुस्लिम समाजाचा कैवार घेऊन पुढाकार घेत आहे,असे दाखविण्याचा प्रयत्न केला जात आहे. काँग्रेसमधील मुस्लिम नेत्यांनी स्थापन केलेल्या कौमी एकता मंचकडे मुस्लिम आमदार होण्यासाठी मजबूत आणि परिपूर्ण असा उमेदवार आहे का असा प्रश्न पडला आहे.कौमी एकता मंच मधील एक दोन नेते वगळता बाकीच्या नेत्यांचा इतिहास पहिला असता,गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत.विविध पोलीस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत.विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असलेल्याना आमदार म्हणून सोलापुरातील मुस्लिम समाज निवडून देतील का असा प्रश्न पडला आहे.
कौमी एकता मंचमधील नेते एकीकडे मुस्लिम उमेदवार द्यावा अशी मागणी करत आहेत तर दुसरीकडे माकप नेते नरसय्या आडम यांच कौतुक करत गुणगान करत भाषण करत आहेत.कौमी एकता मंचच्या सदस्यांची सकाळच्या कार्यक्रमात एक भूमिका आणि दुपारच्या कार्यक्रमात दुसरीच भूमिका असते.कौमी एकता मंच मुसलमानांची दिशाभूल करतेय का?असा प्रश्न सोलापूरकर उपस्थित करत आहेत.
काँग्रेसचे माजी आमदार वजाहत मिर्झा यांच्या अध्यक्षतेखाली इंपीरीयल मंगल कार्यालयात मुस्लिम नेत्यांनी एकत्रित येत भव्य असा कार्यक्रम घेतला होता.वजाहत मिर्झा हे विधानपरिषदेचे आमदार होते,वजाहत मिर्झा यांना विधानपरिषद साठी स्वतःची उमेदवारी टिकवता आली नाही,ते सोलापूरमधील मध्य विधानसभेची जागा मुस्लिम समाजासाठी झगडून घेतील का असे सवाल उपस्थित होत आहेत.
शनिवारी दुपारी सोलापूर शहरातील मौलाली चौक येथील इंपीरीयल मंगल कार्यालयात कौमी एकता मंचच्या वतीने सोलापुरातील सर्व मुस्लिम नेत्यांना प्रतिष्ठीत व्यक्तिना आमंत्रित केले होते.माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे व नवनिर्वाचित खासदार प्रणिती शिंदें हे दोघे प्रमुख पाहुणे होते.कौमी एकता मंचने सोलापूर शहरातील मध्यच्या जागेवर मुस्लिम उमेदवाराला उमेदवारी द्यावा या मागणीसाठी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.सुशीलकुमार शिंदे आणि प्रणिती शिंदेनी या कार्यक्रमाला दांडी मारली.काँग्रेस असो किंवा महाविकास आघाडी असो आजही मुस्लिम आमदार विधानसभेत पाठविणार नाही,अशी चर्चा सोलापुरात सुरू आहे.त्यामुळेचा सुशीलकुमार शिंदे आणि प्रणिती शिंदेंनी या कार्यक्रमाला ठेंगा दाखविला. कारण ही दोघे ही महत्वाच्या अशा या मुस्लिम समाजाच्या बैठकीकडे पाठ फिरवली आहे….
त्यामुळे मुस्लिम समाजात नाराजी दिसत आहे.
ज्यांना मिळाली नाही आमदारकी त्यांनीच दिला शब्द
यवतमाळ येथील असणारे डॉ वजहत मिर्जा हे विधान परिषदेवर आमदार म्हणून त्यांची नियुक्ती काँग्रेस पक्षाकडून करण्यात आलेली होती.त्यांचा कार्यकाळ हे मागील काही दिवसांपूर्वीच संपलेला असताना त्यांना काँग्रेस पक्षाकडून पुन्हा दुसऱ्यांदा विधान परिषदेवर पाठवतील असा त्यांना विश्वास होता पण काँग्रेस ने त्यांना पुन्हा संधी दिली नाही पण काँग्रेस पक्षाच्या सोलापुरातील पदाधिकारी यांनी बोलवलेल्या बैठकीत मात्र डॉ वजाहत मिर्जा मात्र शहर मध्य मतदार संघात मात्र मुस्लीम समाजाच्या व्यक्तीस उमेदवारी मिळवून देणार असे जाहीर केल्याचे पहावयास मिळाले पण प्रत्येक्षात ज्यांना स्वतःची आमदार वाचविता आली नाही त्यांनी मात्र दुसऱ्यास आमदारकीची तिकीट देण्याचे दाखवलेले स्वप्न हे कदाचित मुस्लिम समाजाच्या सामान्य लोकांना पटलेले दिसत नाही हे सुध्दा नक्की आहे….



