भाविक वारकरी मंडळ कडून विविध मागणीसाठी मुख्यमंत्री भेट…
आषाढी वारी ही परंपरा खूप मोठी असून विलक्षण आहे. संपूर्ण भारत देशामध्ये अनेक उत्सव होतात पण सांस्कृतिक वारसा लाभलेली परंपरा फक्त वारी आहे. या वारीसाठी महाराष्ट्र व इतर राज्यातून भाविक वारकरी पंढरीला येतात. त्यांच्या अनेक अडचणी आहेत आणि त्या अनुषंगाने दरवर्षी निवेदन देऊन पाठपुरावा केला जात असतो. यंदाही वारी संदर्भात मा. श्री एकनाथ शिंदे साहेब, मुख्यमंत्री पंढरपूरला पाहणी दौरा करणार असल्याने अक्षय भोसले महाराज यांच्या प्रयत्नाने अखिल भाविक वारकरी मंडळ यांचे माध्यमातुन ह भ प सुधाकर महाराज इंगळे (राष्ट्रिय अध्यक्ष) , ह भ प भागवत चवरे महाराज ( राष्ट्रिय उपाध्यक्ष ) , ह भ प बळीराम जांभळे (राष्ट्रिय सचिव) इ. पदाधिकारी यांनी मुख्यमंत्री यांची भेट घेऊन 65 एकर पंढरपूर येथे चर्चा करुन वारी संदर्भात विविध मागणीसाठी निवेदन देण्यात आले.
1) पंढरपूर येथील ड्रेनेज व गटारी नदीला मिळतात ते बंद करणेत यावं.
2) वारीला येणाऱ्या भाविकांचा मृत्यू नैसर्गिक जरी झाला तरी त्यांना मदत मिळावी.
3) एकादशीला व्ही आय पी दर्शन पूर्ण बंद करणेत यावं.
4) 65 एकर मध्ये कुठलेच शिबिर घेण्यात येऊ नये. ती जागा फक्त वारकरी दिंडीला राखीव असावी.
5) या आषाढीवारी प्रमाणे इतर तीन ही वारीला सरकारने मदत करावी.
6) सर्व वारीला नदीमध्ये वाहते पाणी असावे.
7) अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज हॉस्पिटल कायम स्वरुपी तयार करावे.
अशा विविध मागणीचे निवेदन देण्यात आले. यावेळी अमोल बापू शिंदे, शिवाजी सावंत सर उपस्थित होते.
आपला
सुधाकर महाराज इंगळे
सोलापूर