सोलापूरचे माजी आमदार दिलीप माने यांनी अखेर काँग्रेस मध्ये केला प्रवेश
दिलीप माने यांचा पक्षप्रवेश काँग्रेसला बळकटी देणारा -पटोले

मुंबई, ( प्रतिनिधि):- माजी आमदार दिलीपराव माने यांनी आज रोजी मुंबई टिळक भवन येथे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले, शहर अध्यक्ष चेतन नरोटे, जिल्हा कार्याध्यक्ष नंदकुमार पवार, सुरेश हसापुरे, माजी महापौर संजय हेमगड्डी, मा. नगरसेवक विनोद भोसले, VJNT प्रदेश अध्यक्षा पल्लवी रेणके, प्रदेश प्रतिनिधी सुशील बंदपट्टे, डॉ. पृथ्वीराज माने यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
यावेळी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे साहेब, प्रदेश अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी दिलीपराव यांचे काँग्रेस पक्षात स्वागत करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
आमदार प्रणितीताई शिंदे यांनीही काँग्रेस पक्षात स्वागत करून शुभेच्छा दिल्या.
पक्ष प्रवेशावेळी सिद्धेश्वर कारखान्याचे संचालक सिद्धाराम व्हनमाने,माजी संचालक बाळासाहेब बिराजदार,जिल्हा परिषद माजी सदस्य आप्पासो काळे,माजी उपसभापती संभाजी भडकुंबे,मार्केट कमिटीचे उपसभापती चंद्रकांत खूपसंगे,बाळासो पाटील,ब्रह्मदेवदादा माने बँकेचे चेअरमन सोमनाथ गायकवाड,संचालक गंगाधर बिराजदार, सचिन चौधरी, तानाजी सिनगारे,शावरु वाघमारे, सुशील बंदपट्टे, महेश जोकारे, शिवाजी पाटील,खरेदी-विक्री संघाचे व्हा.चेअरमन मुरलीधर शिंदे,संचालक रवींद्र शिंदे,नितीन भोपळे,प्रताप टेकाळे,सरपंच बालाजी येलगुंडे, गोवर्धन जगताप,बाळासाहेब पाटील,हरिचंद्र राठोड,उमेश भगत,अरुण बिराजदार,नागेश बिराजदार, प्रथमेश पाटील, दक्षिण सोलापूर युवक काँग्रेस अध्यक्ष महेश जोकारे रवी राठोड,रावसो पाटील,राम गायकवाड,इरण्णा पाटील,जगदेव अटकर,संजय जाधव,हरिचंद्र राठोड, राहुल देवकते,राजू गंगदे,गुरुनाथ कोटलगी,विकास पाटील,सचिन गुंड, इरेशा कोळी, श्रीशैल पाटील,भंडारकवठेचे माजी सरपंच चिदानंद कोटगोंडे, बापूराव पाटील निखिल देशपांडे,शकील कुडले,सिद्धारूढ घेरडी,महादेव नरोणे,प्रमोद शिंदे,अंबादास कोळी,निंबर्गीचे उपसरपंच पीरसाब लवगिचे माजी सरपंच अप्पासाहेब पाटील, हवालदार,विशाल भोसले,रेवणसिद्ध साखरे,रमजान नदाफ,भरत आकेन,व्यंकटेश पोतु,श्रीकांत मेलगे पाटील, महे घाडगे,रवी कांबळे,प्रवीण साबळे,युवराज चव्हाण,अंतू देठे,विठ्ठल म्हत्रे,रणजित दवेवाले,नागेश म्हत्रे,राजशेखर पाटील,हनमंत मोतीबने,शाम पाटील,शिवलिंगगौडा पाटील,पृथ्वीराज माने युवा मंचचे अध्यक्ष सुनील जाधव,अजय सोनटक्के,ॲड.अजित पाटील,ओंकार जावीर,अजय रेवजे,गणपत बचुटे,सुनील पाटील,नानासाहेब पवार,जैनु शेखआदीसह सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील आजी माजी जि.प./पं.स./ग्रा.पं.सरपंच,उपसरपंच,सदस्य, सोसायटीचे पदाधिकारी, विविध संस्था,काँग्रेस कमिटी पदाधिकारी उपस्थित होते.