सोलापूर बातमीशैक्षणिक

दि प्रोग्रेसिव्ह उर्दु हायस्कूलमध्ये आनंदाने प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला.

5 जून, 2024 पासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाले आहे. आज शाळेचा पहिला दिवस सर्व मुलांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता.
दि प्रोग्रेसिव्ह उर्दु हायस्कूल सोलापूर येथे नवीन प्रवेश घेतलेल्या इयत्ता पाचवीच्या व सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींचे प्रशालेचे मुख्याध्यापक अ. गफूर सगरी यांनी पुष्पगुच्छ देऊन व फुलांचा वर्षाव करून प्रशालेत स्वागत करण्यात आले. तसेच प्रशालेचे मुख्याध्यापक यांनी प्रास्ताविक सादर केले.
सर्व शिक्षा अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तक वाटपाचा कार्यक्रम करण्यात आले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एजाज शेख यांनी केले. तर आभार प्रदर्शन प्रशालेचे पर्यवेक्षिका सादेका बारागजी यांनी केले.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel