मी बेईमान..तर जगात कोणीही प्रामाणिक नाही, मला… -केजरीवाल
दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया हे दिल्ली मद्य धोरण घोटाळा प्रकरणात जेलमध्ये आहेत. आता या प्रकरणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सीबीआयने 16 एप्रिल रोजी चौकशीसाठी बोलावले आहे. तपास संस्थेने शुक्रवारी केजरीवाल यांना समन्स जारी केला. यात केजरीवाल यांना सीबीआय कार्यालयात हजर राहण्यास सांगितले.
तत्पूर्वी केजरीवाल यांनी आज शनिवारी दुपारी 12 वाजता पत्रकार परिषद घेऊन सीबीआय, ईडी, पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार निशाणा साधला. केजरीवाल म्हणाले- यांनी आमच्या सरकारमधील दोन मंत्र्यांना अटक केली. त्यांनी दोन आणि तीन क्रमांकाच्या नेत्यांना अटक केले. जेणेकरून ते मला अटक करू शकतील. जबरदस्तीने अडकवण्याचा हा डाव आहे. जर मी अप्रामाणिक असेल तर जगात कोणीही प्रामाणिक नाही.
तपास यंत्रणांनांनी न्यायालयात खोटे सांगितले
केजरीवाल म्हणाले- सीबीआय-ईडीने मनीष सिसोदियांवर आरोप केले की त्यांनी पुरावे लपवण्यासाठी 14 फोन तोडले. 5 फोन ईडी आणि सीबीआयकडे आहेत. बाकीचे फोन एका कार्यकर्त्यांकडे असतात. ते नियमित ते फोन वापरत नाहीत. तपास यंत्रणांनीही न्यायालयात खोटे बोलून खोटे आरोप करून मनीष सिसोदिया यांचा जामीन रोखत आहे, असा घणाघाती आरोप केजरीवाल यांनी केला
त्रास देऊन आमच्याविरोधात जवाब देण्याचा कट
केजरीवाल म्हणाले – चंदन रेड्डी नावाचा कोणीतरी आहे. या लोकांनी त्याला एवढी मारहाण केली की, त्याला ऐकू येत नाही. त्याच्या कानाचा पडदा फाटला. सीबीआय-ईडी त्यांना काय उघड करायचे आहे? त्याला थर्ड डिग्री का दिली जात आहे? अरुण रेड्डी, समीर महेंद्रू आणि अजून किती लोक आहेत माहीत नाही, ज्यांचा छळ केला जात आहे आणि आमच्या विरोधात जबाब नोंदविले जात आहेत.
भाजपने केजरीवालांना मद्य घोटाळ्याचे सूत्रधार म्हटले…
केजरीवाल यांच्या पत्रकार परिषदेच्या अर्धा तास आधी भाजपचे प्रवक्ते गौरव भाटिया यांनी पक्षाच्या मुख्यालयात माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले- केजरीवाल 12 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यामुळेच त्यांना काही सार्वजनिक प्रश्न विचारावेत, असे आम्हाला वाटते.