सोलापूर बातमीसोलापूर धार्मिक

रमाई आंबेडकर या फक्त त्यागमूर्ती नसून त्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची प्रेरणा आहेत- योगीराज वाघमारे

आत्तापर्यंत आपण रमाई भीमराव आंबेडकर यांना त्यागमूर्ती म्हणून ओळखतो, त्या त्यागमूर्ती तर आहेतच, त्याशिवाय महत्त्वाचे म्हणजे त्या ज्ञानसूर्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची प्रेरणा आहेत. असे महत्वपूर्ण विचार महाराष्ट्रातील ख्यातनाम साहित्यिक योगीराज वाघमारे यांनी मांडले. ते रमाई आंबेडकर जयंतीनिमित्त नालंदा नगर बुध्द विहारात आयोजित कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी समाजभूषण अण्णासाहेब भालशंकर हे होते.
सभामंचकावर प्रा डॉ मारूती शिंदे, अब्दुल शेख हे उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉ शिंदे म्हणाले की रमाई या परिस्थितीने गरीब होत्या, त्या मनाने अतिशय श्रीमंत होत्या. त्यांनी शेण, गोवऱ्या वेचल्या, विकल्या त्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या आणि स्वतःच्या स्वाभिमानासाठी, अभिमानासाठी. रमाईना कुणी गरीब समजू नये कारण छत्रपती शाहू महाराज यांनी त्यांना बहिण मानले होते.
अध्यक्षस्थानावरून बोलताना भालशंकर म्हणाले की रमाईची जयंती साजरी करीत असताना त्यांच्या विचाराने आचरण करणे गरजेचे आहे. आठरा विश्व दारिद्र्य असताना असताना रमाईंनी पतीबरोबर पुत्रालाही शिकवले. आज आपली परिस्थिती त्यांच्या त्यागामुळे चांगली आहे. शिक्षणात आपण मागे राहता कामा नये.
यावेळी चंद्रकांत मागाडे यांनी रमाईचे बालपण ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या सहधर्मचारिणी पर्यंतच्या जीवनावर प्रकाश टाकला. यावेळी उपाडे सर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक विजयकुमार क्षीरसागर यांनी केले, सूत्रसंचालन अभिजीत दुपारगुडे यांनी केले तर मंडळाचे अध्यक्ष भालेकर यांनी सर्वांचे आभार मानले.
कार्यक्रमाला नालंदा नगर, गणेश नगर, सिटीझन पार्क व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

betkom giris

Proda Login