सोलापूर राजकीय

सोलापुरातील फिल्म मेकर एजाज अहमद यांना Eminences award यावर्षी जाहीर…

मुंबई | प्रतिनिधी
भारतीय चित्रपटसृष्टीतील दिग्दर्शक एजाज अहमद यांना आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रतिष्ठेचा सन्मान मिळणार आहे.

World Record of Excellence, England तर्फे देण्यात येणारा Eminence Excellence Award (EEA25) यावर्षी एजाज अहमद यांना जाहीर झाला आहे. या पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन दि.24 ऑगस्ट 2025 रोजी, रविवार सायंकाळी 6.30 वाजता मुंबईतील Fairfield by Marriott, International Airport, अंधेरी (पूर्व) येथे करण्यात आले आहे.

एजाज अहमद यांना हा सन्मान भारतीय चित्रपटसृष्टीत केलेल्या त्यांच्या उल्लेखनीय योगदानासाठी जाहीर झाला आहे. त्यांच्या नाविन्यपूर्ण कथाकथनशैली, सर्जनशीलता आणि कलात्मक उत्कृष्टतेमुळे भारतीय संस्कृती समृद्ध झाली असून, त्यांनी जागतिक स्तरावर प्रेक्षकांना प्रेरित केले आहे.
या कार्यक्रमाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे – बॉलिवूड आणि भारतीय टेलिव्हिजन क्षेत्रातील मान्यवर कलाकार, प्रभावशाली नेते, समाजसेवक आणि विविध क्षेत्रातील बदल घडवणाऱ्या प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित राहणार आहेत. मानवी मूल्यांचे जतन, शांततेचा संदेश, न्याय्यतेचा प्रसार आणि प्राचीन ज्ञानास आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडण्याचा विचार या सन्मानाच्या मूलभूत संकल्पनेत आहे.

World Record of Excellence, England हे जगभरातील अशा व्यक्तींना गौरविते ज्यांच्या कार्यामुळे समाजाच्या प्रगतीस मोठे योगदान मिळते. या प्रतिष्ठित मंचावर एजाज अहमद यांचा गौरव होत असल्यामुळे भारतीय चित्रपटसृष्टीचा लौकिक आणखी वाढणार आहे.
कार्यक्रमानंतर सर्व मान्यवरांसाठी खास डिनरचे आयोजन देखील करण्यात आले आहे.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel