महाराष्ट्रराजकीयलोकसभा बातमी 2024सोलापूर बातमीसोलापूर राजकीय

सोलापूर ब्रेकिंग.. राष्ट्रवादी उत्तर विधानसभा अध्यक्षने केला भाजप प्रवेश, पैलवान युवराज सरवदेचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रवेश

सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे भाजप मित्र पक्षाचे उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचार सभेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज सोलापुरात होते. या निमित्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हेही सोलापुरात आले होते, यावेळी शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख यांच्या निवासस्थानी देवेंद्र फडवणीस यांनी सदिच्छा भेट दिली, या भेटी दरम्यान राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शहर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष पैलवान रविराज सरवदे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

पैलवान रविराज सरवदे यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते तथा माजी महापौर महेश कोठे यांच्या माध्यमातून शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात युवकांची मोठी फळी तयार केली होती. यापूर्वी त्यांनी शहर उत्तर मध्ये युवकांचे अनेक मिळावे घेतले परंतु भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांच्यावर विश्वास ठेवून त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करत केलेला राजकिय भूकंप मात्र शहर उत्तर मध्ये चांगलाच चर्चेचा विषय झाल्याचे पहावयास मिळते.या प्रवेशावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख, माजी सभागृहनेते संजय कोळी, भाजप नेते राजकुमार पाटील आणि रविराज सरवदे यांचे मित्रपरिवार उपस्थित होते.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

betkom giris

Proda Login