महाराष्ट्र

विधानभवनात राहुल गांधींच्या फोटोला सत्ताधाऱ्यांनी मारले जोडे…

भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांविरोधात केलेल्या वक्तव्यावरुन विधिमंडळ परिसरात शिवसेना व भाजपच्या आमदारांनी जोरदार घोषणाबाजी केली. सत्ताधाऱ्यांनी राहुल गांधींच्या प्रतिमेला जोडे मारत आंदोलन केले. त्याचे पडसाद आज अधिवेशनात उमटले.

अजित पवारांचा आक्षेप

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सत्ताधाऱ्यांच्या या कृतीवर जोरदार आक्षेप घेतला. अजित पवार म्हणाले, आतापर्यंत विरोधकांनी अधिवेशन व्यवस्थित चालू दिले. मात्र, आज सकाळी सत्ताधारी पक्षाच्या काही लोकांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या फोटोला जोडे मारले. विधिमंडळाच्या आवारात अशी कृती करणे योग्य नाही. उद्या विरोधकही अशा पद्धतीने एखाद्या नेत्याविरोधात जोडे मारो आंदोलन करतील.

जोडो मारो आंदोलन करणार नाही

त्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, विधिमंडळ परिसरात अशा पद्धतीने आंदोलन करणे योग्य नाही. विरोधी पक्षाच्या भावनेशी मी पूर्ण सहमत आहे. सभागृहाच्या आवारात कोणत्याही नेत्याविरोधात जोडो आंदोलन करणार नाही, असे मी सत्तारुढ पक्षाकडून आश्वासन देतो.

विधिमंडळात असे पूर्वी कधी घडले नव्हते

राहुल गांधींच्या फोटोला जोडे मारल्याचा काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनीही निषेध केला. बाळासाहेब थोरात म्हणाले, विधिमंडळाच्या आवारात लोकांचे प्रश्न मांडायचे असतात. मात्र, आज विधानसभेत काही सदस्यांनी राहुल गांधींच्या फोटोला चपलीने मारण्याचा अविर्भाव केला. विधिमंडळाच्या आवारात असे यापूर्वी कधीही घडले नव्हते.

सत्ताधाऱ्यांचे ढोंग

बाळासाहेब थोरात म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज, संत तुकाराम, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांचा अवमान करणाऱ्यांना सत्ताधाऱ्यांनी संरक्षण दिले. आता स्वातंत्र्यवीर सावरकरांवरुन ते आक्रमक भूमिका घेत आहे. सत्ताधाऱ्यांचे हे सर्व ढोंग आहे.

विरोधकांनीही हीन प्रवृत्ती सोडावी

विरोधकांच्या टीकेवर देवेंद्र फडणवीस म्हणाले, स्वातंत्र्यवीर सावरकरांनी स्वातंत्र्यासाठी जे भोगले, ते कुणीच भोगलेले नाही. सावरकरांनी 11 वर्षे अंदमान कारागृहात अनन्वित अत्याचार सहन केले. तरीही ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम’चा जयघोष सावरकरांनी सोडला नाही. त्यामुळे त्यांच्याविरोधात कुणीही निषेधार्ह वक्तव्य करत असेल तर त्याचा निषेध झालाच पाहीजे. त्यामुळे विरोधकांनीही स्वातंत्र्यवीर सावरकरांविरोधात असे वक्तव्य करण्याची हीन प्रवृत्ती बंद केली पाहीजे.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

betkom giris

Proda Login