सोलापुरात पुन्हा अपघात…कुठे झालं पहा…

तुळजापूर पुणे नाका रोडवर, डी मार्ट समोर दुपारी साडेतीनच्या सुमारास मुसळधार पावसात पिकअप वाहनाचा ब्रेक फेल झाल्याने भीषण अपघात घडला. या अपघातात पिकअप वाहनाने प्रथम महा मार्गावरील दुभाजकाला जोरदार धडक दिली आणि त्यानंतर सर्व्हिस रोडवरील इतर वाहनांना धडकली. या घटनेत दोन जण गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.प्रत्यक्षदर्शींनुसार, पावसामुळे रस्ता निसरडा झाला होता, आणि पिकअप चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. अपघातानंतर परिसरात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना रुग्णालयात हलवले आणि वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू केले.
जखमींपैकी एकाची प्रकृती गंभीर असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातामुळे परिसरात खळबळ उडाली असून, नागरिकांनी रस्त्यावरील सुरक्षिततेबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. पावसाळ्यात रस्त्यांची दुरवस्था आणि वाहनांच्या तांत्रिक समस्यांमुळे अशा घटना वाढत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.



