Solapur court matterक्राईमन्यायालय निर्णयमहाराष्ट्रसोलापूर क्राईमसोलापूर बातमी

विवाहित महिलेवर दुष्कर्म केल्याप्रकरणी आरोपीची जामीनावर मुक्तता…

सोलापूर- दि. २४/०७/२०१८ ते दि.२६/१/२०२४ पर्यंत पिडीत फिर्यादी ही तिच्या नवऱ्याच्या त्रासाला कंटाळून सन २०१५ मध्ये वर नमूद रेवणसिध्देश्वर नगर, सोलापूर येथे भाडयाने राहत असून, तिच्या घराशेजारी राहणारा शुभम पांडुरंग सावंत, वय-२७ वर्षे, रा. रेवणसिध्देश्वर मंदिर, विजापूर रोड, सोलापूर जुलै २०१८ रोजी रात्री ११.३०वा. आरोपी हा पिडीताच्या घरी येवून बंद घराचे दाराची कडी वाजवून पिडीतास दार उघडण्यास लावले पिडीताचे हात पकडून शरीर सुखाची मागणी करु लागला. त्यावेळी आरोपीने पिडीतास मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही, माझे तुझ्यावरती प्रेम आहे, तु मला नाही म्हणू नको, असे म्हणून पिडीतास जबरदस्ती करु लागला व पिडीतास म्हणाला की, मी तुझ्याशी लग्न करणार आहे, काळजी करु नको असे म्हणून पिडीताशी इच्छा नसतांना बळजबरीने शरीरसंबंध ठेवला.

त्यानंतर वेळोवेळी दि.२६/०१/२०२४ पर्यंत पिडीताच्या घरी जावून तिच्या इच्छेविरुध्द बळजबरीने शरीरसंबंध ठेवल्याप्रकरणी पिडीत महिलेने दि.०६/०२/२०२४ रोजी सदर बझार पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल केली त्यानंतर पो.उप.नि लोंढे यांनी सदर आरोपीस अटक करुन न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीस न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. सदर गुन्हयाचा तपास वरील पोलीसांनी केला व दि.१२/०४/२०२४ रोजी पोलीसांनी मा.प्रथम वर्ग मुख्य न्यायदंडाधिकारी साो.. यांचे न्यायालयात सदर आरोपीविरुध्द दोषारोपपत्र दाखल केला.

सदर आरोपीने जामीनासाठी सोलापूर येथील जिल्हा व सत्र न्यायालयात जामीनाचा अर्ज दाखल केला असता, अर्जाच्या सुनावणीच्या वेळेस आरोपीच्या वकीलांनी मे. उच्च न्यायालयाचे न्यायनिवाडे सादर करुन युक्तीवाद केला की, सदर पिडित महिला ही विवाहित असून, तिचे वय आरोपीच्या वयापेक्षा जास्त असल्याने, आरोपीस शरीरसंबंधास संमती दिल्याचे फिर्यादवरुन दिसून येते व सन २०१८ पासून पिडीत महिलेने अत्याचाराबाबत व दुष्कर्माबाबत कोठेच तक्रार केलेली नाही, या मुद्दयावर मे. जिल्हा व सत्र न्यायाधिश एस.आर. शिंदे साो., यांनी आरोपीस पन्नास हजाराच्या जातमुचलक्यावर जामीनावर मुक्त केला.

यात सरकार पक्षातार्फे अॅड. दत्ता पवार यांनी तर आरोपीतर्फे अॅड. सचिन एच. इंगळगी, अॅड. प्रविण लोमटे, अॅड. ऐश्वर्या पडवळ यांनी काम पाहिले

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

betkom giris

Proda Login