महाराष्ट्र

शहराबरोबरच खेड्यापाड्यात दंगली भडकवण्याचे सरकारचे षडयंत्र – अंबादास दानवें

गेल्या काही दिवसांपासून शहरातच नव्हे तर गावखेड्यापाड्यात दंगली भडकण्याचे काम सुरू आहे, असा आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला. तर सरकारवर निशाना साधत त्यांनी अनेक मुद्द्यांना हात घातला.

अंबादास दानवे म्हणाले की, शिंदे फडणवीस सरकार हे हिंदुत्ववादी नसून हिंदूविरोधी सरकार आहे. त्याचे कारण म्हणजे काल आळंदीत झालेल्या घटनेवरून ठरवता येईल. धक्कादायक बाब म्हणजे गेल्या काही दिवसांपासून विशेषतः मार्च महिन्यापासून राज्यात जातीय तेढ निर्माण केला जात आहे.

जातीय तेढ निर्माण करण्याचे काम
हिंदू मुस्लिम तेढ निर्माण करणे, त्याचे राजकारण केले जात आहे. ज्याप्रमाणे कर्नाटकात घटना घडल्या. त्याचप्रमाणे महाराष्ट्रात देखील राजकारण केले जात आहे. असा आरोप दानवेंनी केला.

भाजपकडून राजकीय पोळी भाजण्याचे काम सुरू
भाजपच्या अधिकृत ट्विटर हॅन्डलवरून औरंगजेबाचे नाव घेऊन वेगवेगळ्या नेत्यांचे फोटो टाकले गेले. पाकिस्तान, औरंगजेब असे नाव घेऊन पोळी भाजण्याचे काम केले जात आहे. असा आरोप अंबादास दानवे यांनी केला.

औरंगजेब कबरीचा संरक्षित स्मारक दर्जा काढून घेण्याची मागणी
संभाजीनगर, नगर, संगमनेर, कोल्हापूर तर स्टेट्स ठेवण्याचे काम सातत्याने सुरू आहे. सर्वप्रथम पोस्टर फडकावणाऱ्यावर कारवाई झाली असती तर राज्यात अशाप्रकारे कोणाची पुन्हा पुन्हा पोस्टर झळकावण्याची वेळ आली नसती.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel