सोलापूर बातमीराजकीयशैक्षणिकसोलापूर सामाजिक

शासकीय रेखाकला परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार…

महाराष्ट्रासह पाच राज्यात शासकीय रेखा कला परीक्षा घेतली जाते. याचे नियोजन कला संचालनालय, मुंबई.मार्फत घेण्यात येत असलेल्या शासकीय रेखाकला (एलिमेंट्री इंटरमिजिएट चित्रकला ग्रेड) परीक्षा 2024 मध्ये एकूण 7 लाख 50 हजार 935 विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट होते. सोलापूर जिल्ह्यातून 23 हजार 410 विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले होते . पहिल्यांदाच 100 विद्यार्थ्याच्या गुणवत्ता यादीत सोलापूरचे 28 विद्यार्थ्यांनी आपले यश संपादन केले . या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
सोलापूर जिल्हा शैक्षणिक कला शिक्षक संघटनेतर्फे करण्यात आले.
19 फेब्रुवारी शिवजयंतीचे औचित्य साधून शासकीय रेखाकला परीक्षा (एलिमेंटरी इंटरमिजिएट ग्रेड ) मध्ये सोलापूर शहरातील विशेष प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा संपन्न झाला. सर्वप्रथम छत्रपतींच्या प्रतीमेस पुष्प अर्पण करण्यात आले. यावेळी राज्याध्यक्ष शेरशाह डोंगरी यांनी म्हणाले चित्रकलेत पारंगत असलेले विद्यार्थीच अभ्यासात हुशार असतात.
विद्यार्थ्यांचा गौरव स्मृतिचिन्ह, दोनशे रुपयाचे बंद पाकीट व पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले. अखिल महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संघटनेचे राज्य अध्यक्ष माननीय श्री. शेरशहा डोंगरी यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम घेण्यात आला तर राज्य उपाध्यक्ष माननीय श्री ‌शशिकांत मोटगी व राज्य सहसचिव माननीय श्री.शांतप्पा काळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ‌जिल्हाध्यक्ष श्री.शशिकांत सदाफुले, सचिव संतोष धारेराव, ज्ञानेश्वर कांबळे , सचिन कोरे, शैलेश कुलकर्णी, सिद्धाराम काळे,चेतन महाजन, नागराज रमणशेट्टी, मोहन कांबळे, सोमेश्वर म्हेत्रे, अविनाश पवार, सुभाष सुतार आदी कलाशिक्षक , गुणवंत विद्यार्थी व पालक उपस्थिती होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष धारेराव यांनी केले व शेवटी आभार प्रदर्शन शैलेश कुलकर्णी यांनी केले

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

betkom giris

Proda Login