शेटफळ ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांना यश…
शेटफळ ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी आज डॉक्टर तुषार सरवदे वैद्यकीय अधीक्षक यांच्या अथक परिश्रमातून लता अनिल बिल्लाळे राहणार खंडाळी तालुका मोहोळ येथे मजुरीसाठी असताना त्यांच्या पोटामध्ये दुखायला लागले व आपली ग्रामीण रुग्णालयाची रुग्णवाहिकेच्या माध्यमातून त्यांना सिद्धेश्वर राऊत यांनी दवाखान्यांमध्ये ऍडमिट केले त्यावेळी या महिलेला जोरात वेदना होत होत्या पण डॉक्टर तुषार सरवदे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रसूती ग्रहांमध्ये नेण्यात आली त्यावेळी या महिलेने तीन बालकांना जन्म दिला त्यामध्ये एक मुलगी व दोन मुले असून ते सध्या पंढरपूर येथील रुग्णालयात उपचार घेत आहेत बाळ व बाळंतीण हे सुखरूप असून त्यांच्यावरती डॉक्टर तुषार सरवदे वैद्यकीय अधीक्षक शेटफळ ग्रामीण रुग्णालय यांच्या वतीने उपचार सुरू आहेत यावेळी त्यांना उर्मिला दीक्षित अयोध्या राणी धनवे वर्षाराणी बोडके रोहित देवकर लखन पवार रोहित ढगे रोहन गायकवाड डॉक्टर प्रदीप पाटील यांचे सहकार्य लाभले असून हा अनोखा संगम शेटफळ ग्रामीण रुग्णालयामध्ये दिसून आला असून ही महिला खंडाळी येते सचिन बाबर यांच्या शेतामध्ये काम करत आहेत त्या मूळच्या निवळी तालुका मुखेड जिल्हा नांदेड येथील रहिवासी असून त्यांची ही प्रसूती प्रथम वेळचीच असल्यामुळे डॉक्टरांच्या अथक परिश्रमामुळे ही सुखरूप पणे या संकटातून निभावले असून त्यांच्या वरती उपचार ग्रामीण रुग्णालय शेटफळ या ठिकाणी होत आहेत