महाराष्ट्र

शाळेत पालकांना पाहताक्षणी तिनं दुसऱ्या मजल्यावरून घेतली उडी, आता आई-वडिलांना एकच प्रश्न!

गेल्या काही दिवसांत तरुणांमध्ये नैराश्याचे प्रमाण वाढत चालले आहे. या नैराश्यातून तरुण आत्महत्या करत असल्याच्या घटनाही समोर येत आहेत. असाच एक प्रकार सांगलीत घडला आहे.

एका अल्पवयीन तरुणीने पालकांच्या समोरच शाळेच्या दुसऱ्या मजल्यावरुन उडी घेत आत्महत्या केली आहे. या घटनेने कुटुंबीयांना एकच धक्का बसला आहे.

सांगलीच्या कुपवाड येथील बामणोली मधील एका खाजगी महाविद्यालयाच्या दुसऱ्या मजल्यावरुन विद्यार्थिनीने पालकांसमोर उडी घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार घडला आहे. एक नामांकित शाळा आणि ज्युनिअर कॉलेजमध्ये ही घटना घडली आहे. अल्पवयीन मुलीने शाळेतच आत्महत्या केल्याने शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शाळे सुटल्यानंतर नेहमीप्रणाणे ही अल्पवयीन तरुणी गेटबाहेर आली. त्यानंतर तिने तिची स्कूल बॅग स्कूल व्हॅनमध्ये ठेवली त्याचवेळी शाळेच्या आवारात तिचे पालकदेखील आले होते. पालकांना पाहताच विद्यार्थिनीने थेट शाळेत धाव घेतली. गेटमधून शाळेच्या आत शिरताच ती थेट दुसऱ्या मजल्यावर गेली. दुसऱ्या मजल्यावर गेल्यानंतर तिने पालकांच्यादेखतच तिथून उडी घेतली. पालकांच्या समोरच हा सर्व प्रकार घडल्याने एकच खळबळ उडाली आहे.

दुसऱ्या मजल्यावरुन उडी घेतल्यानंतर ती गंभीर जखमी झाली होती. रक्ताच्या थारोळ्यात ती पडली होती. शाळा प्रशासनाने व तिच्या पालकांनी तिला गंभीर जखमी अवस्थेतच रुग्णालयात दाखल केले. मात्र, डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने आणि अतिरक्तस्त्राव झाल्याने उपचारादरम्यानच अल्पवयीन तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेची नोंद कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात झाली असून नेमकी ही आत्महत्या तिने का केली,हे स्पष्ट होऊ शकले नाही.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

betkom giris

Proda Login