सोलापूर बातमी

आ. सुभाष देशमुख यांच्या प्रयत्नातून तब्बल 91 रुग्णांना आर्थिक मदत

सोलापूर- राज्यातील आर्थिक परिस्थिती नाजूक असलेल्या गरीब कुटुंबांना वैद्यकीय खर्चासाठी आर्थिक मदत मुख्यमंत्री सहायता निधी मधून केली जाते. यामध्ये आमदार सुभाष देशमुख यांनी तब्बल 91 जणांना आर्थिक मदत केली आहे.

आ. सुभाष देशमुख यांनी दिलेल्या शिफारशीनुसार 1 जुलै 2022 ते 1 मार्च 2024 या कालावधीत 91 रुग्णांना एकूण 71 लाख 82 हजार 500 रुपये इतका निधी वैद्यकीय उपचारासाठी मिळवून दिला आहे. आ. देशमुख यांनी यासाठी आपल्या कार्यालयात विशेष व्यवस्था केली आहे. फॉर्म भरण्यापासून ते पाठपुरावा करून लवकरात लवकर रुग्णाला मदत मिळावी यासाठी प्रयत्न केले जातात. फक्त मतदारसंघातीलच नागरिक नाहीतर इतर भागातून आलेल्या गरजूंनाही आ. सुभाष देशुमख यांनी शिफारस पत्र देवून मुख्यमंत्री सहायता निधी मिळवून दिला आहे. तसेच एप्रिल व मे 2024 या दोन महिन्यात 21 रुग्णांना 20 लाख रुपयांची मदत मिळवून दिली आहे. या बरोबरच महात्मा फुले जनआरोग्य योजना, गोपिनाथ मुंडे अपघात विमा योजना अशा अनेक योजनांतून गरजवंताला मदत व्हावी यासाठीही सहकार्य केले आहे.
एखाद्या कुटुंबातील सदस्याला दुर्धर आजार झाला असेल आणि त्याची परिस्थिती कमकुवत असेल अशा रुग्णाला औषधोपचारासाठी ही आर्थिक मदत केली जाते. मुख्यमंत्री सहायता निधी मिळण्यासाठी राज्यातील विधानसभा किंवा विधानपरिषद सदस्य यांचे शिफारस पत्र, रुग्णालयाचे कोटेशन, रुग्णालयात रुग्ण दाखल असल्याचा दाखला मदत अर्जासोबत सादर करावा लागतो. ही सुविधा आमदार सुभाष देशमुख यांच्या विकास नगर येथील संपर्क कार्यालयात उपलब्ध आहे.
चौकट
सिव्हिलमधील रुग्णांच्या नातेवाईकांनाही जेवणाची सोय
आमदार सुभाष देशमुख यांनी केवळ मुख्यमंत्री सहाय्यता निधीतूनच रुग्णांना मदत केली नाही तर सामाजिक बांधिलकी जपत सिविल हॉस्पिटल मधील रुग्णांच्या नातेवाईकांनाही जेवणाची सोय केली आहे. आ. सुभाष देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या लोकमंगल फाऊंडेशनतर्फे अन्नपूर्णा योजनेतून दोनवेळच्या जेवणाचा डबा जागेवर पोहोच केला जात आहे.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

betkom giris

Proda Login