सोलापूर बातमी

सोलापुरात लष्कर येथील गॅस गळतीच्या दुर्दैवी घटनेत चौथा बळी; रंजनाबाई बलरामवाले यांचा मृत्यू

सोलापूर शहरातील लष्कर परिसरातील नळबाजार चौकात रविवारी (३१ ऑगस्ट २०२५) रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडलेल्या गॅस गळतीच्या धक्कादायक घटनेने संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. या घटनेत बलरामवाले कुटुंबातील पाच जण बेशुद्ध अवस्थेत आढळल्यानंतर त्यांना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

या दुर्घटनेत रविवारी रात्री दोन चिमुकल्यांचा, हर्ष (वय ६ वर्ष) आणि अक्षरा (वय ४ वर्ष) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. त्यानंतर सोमवारी (१ सप्टेंबर २०२५) रोजी सकाळी ९:२५ वाजता या चिमुकल्यांच्या आजी, विमल मोहनसिंग बलरामवाले (वय ६०) यांचेही निधन झाले होते. त्या तिघांवर कल अंत्यसंस्कार करण्यात आले.

आता या घटनेत आणखी एक दुख:द बातमी समोर आली आहे. या दोन्ही चिमुकल्यांची आई आणि विमल बलरामवाले यांची सून, रंजनाबाई युवराज बलरामवाले (वय ३५) यांचाही आज, मंगळवारी (२ सप्टेंबर २०२५) रोजी सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला.

या कुटुंबातील शेवटची व्यक्ती, युवराज मोहनसिंग बलरामवाले (वय ४०) यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.

या दुर्दैवी घटनेमुळे लष्कर, बेडरपूल परिसरासह संपूर्ण सोलापूर शहरात हळहळ व्यक्त होत आहे.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel