सावत्र पित्याकडून 12 वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार…
हडपसर परिसरात रहाणाऱ्या एका कुटुंबातील 12 वर्षाच्या मुलीवर मागील 2 वर्षापासून राहत्या घरात सावत्र पित्याने लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी 35 वर्षीय पित्यावर हडपसर पोलिस ठाण्यात बलात्कारासह पाेक्साे कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
याबाबत सावत्र पित्या विराेधात 12 वर्षीय मुलीने पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. सन 2021 ते 29/5/2023 यादरम्यान हा प्रकार घडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आराेपी हे संबंधीत मुलीचे सावत्र वडील आहे. ती अल्पवयीन असल्याचे माहिती असतानाही त्यांनी वेळाेवेळी तिच्या अंगावरुन वाईट हेतूने हात फिरवून तिच्यासाेबत जबरदस्तीने शारिरिक संबंध केले. याबाबत काेणाला काही सांगितले तर, तुला विष पाजून मारुन टाकण्याची धमकी त्यांनी मुलीस दिली हाेती. याबाबत पुढील तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक एस जाधव करत आहे.