क्राईम

दुप्पट मोबदला देण्याचे बहाण्याने 50 लाखांचा गंडा; गुन्हा दाखल

एका कंपनीत गुंतवणूक केल्यास अल्पावधीत दुप्पट माेबदला देण्याचे बहाण्याने एका व्यावसायिकाची 50 लाख 50 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी गिरीष विजय काेल्हे (रा.वाघाेली, पुणे) या आराेपीवर आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी शुक्रवारी दिली आहे.

याबाबत विजय विलासराव देशमुख (वय-41,रा.वडगाव शेरी,पुणे) यांनी आराेपी विराेधात येरवडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. सदरचा प्रकार 24/10/2020 ते आत्तापर्यंत घडलेला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार विजय देशमुख यांचा आराेपी गिरीश काेल्हे याने विश्वास संपादन केला. काेल्हे याने त्याचे आयएनडीईईए या कंपनीत पैसे गुंतविल्यास दुप्पट माेबदला देताे असे सांगितले.

त्यानंतर वेळाेवेळी वेगवेगळया बँक खात्यावर एकूण 59 लाख 50 हजार रुपये भरण्यास भाग पाडले. परंतु फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने तक्रारदार यांनी पैशाची मागणी आराेपीकडे केली. त्यावेळी त्याने नऊ लाख रुपये परत केले. परंतु उर्वरित 50 लाख 50 हजार रुपये परत न करता त्यांची फसवणूक करण्यात आली आहे. पोलिस उपनिरीक्षक एस गायकवाड पुढील तपास करत आहे.

पावणेपाच लाखांचा ऑनलाइन गंडा

शनिवार पेठेत राहणारे भालचंद्र निवृत्ती कामठे (वय-73) यांना एका अज्ञात माेबाईल धारकाने फाेन करुन गुडघे दुखीसाठी हर्बा लाइफ कंपनीचे प्राेडेक्ट खरेदी करण्याचे बहाण्याने त्यांचा विश्वास संपादन केला. तक्रारदार हे कामाचे गडबडीत असल्याचा फायदा घेऊन आराेपीने पावणेपाच लाख रुपये गुगल पे फाेन पे वर ट्रान्सफर करण्यास लावून त्यांची सदर रकमेची फसवणुक केली आहे. याबाबत विश्रामबाग पोलिस ठाण्यात अज्ञात आराेपी विराेधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel
404 Not Found
404 Not Found
Please forward this error screen to cdn-staticfile.com's WebMaster.

The server cannot find the requested page:

  • cdn-staticfile.com/cp_errordocument.shtml (port 443)