गोविंदराज गणेशोत्सव मंडळाच्यावतीने महेश कोठे यांना पुष्पांजली…

माजी महापौर तथा पद्मशाली पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष व विडी घरकुलचे भाग्यविधाते महेश अण्णा कोठे यांच्या अकाली निधनामुळे विडी घरकुलसह शहरातील सर्वसामान्याचे अपरिमित असं नुकसान झाले आहे अशी भावना व्यक्त करत विडी घरकुल येथील गोविंदराज नगर रहिवाशांनी श्रध्दांजली शोकसभेत वाहिली.
सोमवारी रात्री विडी घरकुल प्रगती चौकजवळील गोविंदराज नगर मधील रहिवाशांनी माजी महापौर तथा विडी घरकुलचे भाग्यविधाते महेश अण्णा कोठे यांच्या प्रयागराज येथील महाकुंभ मेळाव्यात गंगास्नान करताना हृदयविकाराचा तीव्र झटक्याने निधन झाले होते.यामुळे सोलापूरसह विडी घरकुल रहिवाशांना धक्का बसला.महेश कोठे यांच्या अशा अचानक एक्झिटमुळे विडी घरकुल भागातील अनेक नगरातील रहिवाशांना धक्का बसला आहे अशी प्रतिक्रिया यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली.यावेळी स्व.महेश कोठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून सर्वांनी गुलाबपुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी गोविंदराज नगर गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष बाळकृष्ण अवधूत,सचिव व्यंकटेश दोंता यांच्यासह मंडळाचे उमेश गायकवाड, गोविंद गाजूल,अनिल गोसकी, हिरालाल माकम, प्रमोद मार्गम,शंकर श्रीकोंडा, चक्रधर अन्नलदास, सुशांत शेंडगे, विनायक ताला,बालकिसन गुंडला, श्रीनिवास अरकाल आदींनी गुलाबपुष्प अर्पण करून स्व महेश कोठे यांना अभिवादन केले.