सोलापुरातील भैय्या पाटीलसह 5 जणांवर गुन्हा दाखल…

सोलापूर ( प्रतिनिधि):टु व्हिलर ही फिर्यादीच्या अंगावर घातल्यासारखे केल्याने मनोहर जमादार याने त्यास जाब विचारले असता यातील आरोपी भैय्या पाटील रा-पत्रा तालीम व त्याचेसोबतचे असलेले इतर अनोळखी ५ जण हे फिर्यादी जमादार यास शिवीगाळ करून मनोहर दत्तात्रय जमादार, वय-२३ वर्षे, रा- जुनी मिल चाळ मुरारजी पेठ सोलापूर यास लाकडी वाशाने डोक्यात मारून जखमी केले म्हणून भैय्या पाटील सह इतर 5 अनोळखी व्यक्तींविरुद्ध फौजदार चावडी पोलिस ठाणे येथे भादवि १४३,१४७,१४९, ३४१,३२४, ५०४,५०६ मपोका १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
यात हकिकत अशी की, वरील वेळी व ठिकाणी, यातील फिर्यादी हा २३.१५ वा. हमसफर ट्रॅव्हल्स ऑफिसचे समोरील रोडचे पलीकडे गदग लॉड्रीसमोरील रोडवरून ट्रॅव्हल्स गाडीतील पार्सल खांदयावर घेवून जात असताना यातील वरील आरोपीत यांने टु व्हिलर ही फिर्यादीच्या अंगावर घातल्यासारखे केल्याने फिर्यादीने त्यास जाब विचारले असता आरोपीत मजकूर हा फिर्यादीस शिवीगाळ करून गेला व २३.५० वा. त्याच्यासोबत अनोळखी पाच इसम घेऊन येऊन फिर्यादीस हमसफर ट्रॅव्हल्स ऑफिसचे बाहेर फुटपाथवर टु व्हीलर आणुन यातील आरोपीतानी हातात लाकडी वाशा घेवून गाडीवरून उतरून हातातील लाकडी वाशाने फिर्यादीच्या डोक्यात मारहाण केली त्यावेळी फिर्यादीने डावा हात आडवा घातल्याने फिर्यादीच्या डाच्या हातास मार लागला त्यानंतर ते मारहाण करू लागल्याने फिर्यादी घाबरून नवीवेस पोलीस चौकीचे पाठीमागील बोळातून फौजदार चावडी पोलीस ठाणेकडे पळत जात असताना सरस्वती चौकातील पी.पी. मोबाईल स्टोअर मध्य रेल आरक्षण केंद्र या दुकानासमोर रोडवर आला असता आरोपीत व आरोपीताचे इतर ४ अनोळखी साथीदारांनी येवून फिर्यादीस रस्त्यात अडवून पुढे जावू दिले नाही त्यावेळी भैय्या पाटील हा त्याच्या एका साथीदारासोबत मोटार सायकलीवरून आला भैय्या पाटील त्याच्या हातातील लाकडी वाशाने फिर्यादीचे डाव्या पायावर कंबरेवर मारून हाताने फिर्यादीचे पोटात, पाठीत तोडांवर मारले तसेच त्यातील अनोळखी एका इसमाने त्यांचे हातातील लाकडी वाशाने फिर्यादीचे पाठीत मारल्याने फिर्यादीस चक्कर येवून फिर्यादी खाली पडला. रस्त्याने येणारे जाणारे लोकांना मदतीकरीता वाचवा वाचवा म्हणून हाक मारीत असताना भैय्या पाटीलने कोण मध्ये आले तर याद राखा असा दम दिल्याने फिर्यादीच्या मदतीला कोणी आले नाही त्याचवेळी भैय्या पाटील याने हाताने फिर्यादीचे तोंडावर मारहाण केली त्यानंतर फिर्यादीचे ऑफिस मधील मॅनेजर स्वामी हे आले त्यांनी फिर्यादीस गाडीवर बसवून उपचाराकरीता घेवून गेले आहे.सादर घटनेचा तपास सपोनि गायकवाड हे करीत आहेत.



