सोलापूर बातमी

सोलापुरातील सुप्रसिद्ध नकलाकार नारायण होनप उर्फ रोशनकुमार यांचे निधन

सोलापूर, – जुन्या काळातील सुप्रसिद्ध नकलाकार, समाजसेवक आणि बहुआयामी व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जाणारे नारायण वामन होनप उर्फ प्रभाकर उर्फ रोशनकुमार (वय ८२) यांचे मंगळवारी (१४ ऑगस्ट) मुंबईतील भांडुप येथे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, तीन मुली, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे.

नारायण होनप यांचा जन्म २३ ऑक्टोबर १९४३ रोजी सोलापुरात झाला. त्यांचे वडील जुनी मिलमध्ये कार्यालयीन कर्मचारी होते. चौपाड येथील एका चाळीत वाढलेल्या श्री. होनप यांनी आपले प्राथमिक शिक्षण दत्त चौकातील महापालिका शाळेत, तर माध्यमिक शिक्षण विद्याविकास शाळेत पूर्ण केले. फक्त मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण असूनही त्यांनी विविध क्षेत्रांत आपल्या कामगिरीची छाप उमटवली. नकलाकार म्हणून ते राज्यभर प्रसिद्ध होते. रोशनकुमार या नावाने ते नकलांचे कार्यक्रम करत. त्यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक शाळा, महाविद्यालयात नकलांचे कार्यक्रम केले.

कलाक्षेत्राबरोबरच त्यांनी धर्मकार्य, समाजकार्य, प्रशासन आणि अगदी राजकारणातही सक्रिय सहभाग घेतला.

श्रीधर स्वामींचे ते भक्त होते. सज्जनगडावरील वास्तव्य, सेवा, आणि स्वामींनी दिलेल्या पादुका यामुळे त्यांच्या जीवनात अध्यात्मिक स्थैर्य आले. १९७३ नंतर दरवर्षी स्वामींच्या पुण्यतिथीचा उत्सव ते सोलापूरात, तर २०२१ पासून पुण्यात साजरा करत होते. सज्जनगडावरील श्री समर्थ सेवा मंडळ व रामदास स्वामी संस्थान यांच्या विविध उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता.

‘सेल्फ मेड मॅन’ ही उपाधी त्यांच्या जीवनशैलीला योग्य ठरावी. संघर्षांना सामोरे जात, आत्मविश्वासाने भरलेले आणि सदैव प्रसन्न राहणारे व्यक्तिमत्त्व म्हणून नारायण वामन होनप यांची ओळख होती.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

betkom giris

Proda Login