क्राईमदेश - विदेशमहाराष्ट्रराजकीयसोलापूर क्राईम

सोलापुरात आपच्या कार्यकर्त्यांना फरफटत घेऊन गेले

सोलापूर.......आम आदमी पार्टी यांचे मोठे आंदोलन

आचारसंहिता असल्याने आंदोलनास परवानगी नव्हती

सोलापूर:दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक करताच दिल्ली पासून आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.सोलापुरात देखील शुक्रवारी आम आदमी पार्टीच्या वतीने केंद्र सरकार विरोधात आंदोलन आयोजित करण्यात आले होते.लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापुरात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे.जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सोलापुरात होणाऱ्या सर्व आंदोलनावर बंदी घातली आहे.सोलापुरात आम आदमी पार्टीच्या आंदोलकांना आंदोलन करण्यास मनाई केली असताना सुद्धा आंदोलन करण्याचा प्रयत्न झाला.जिल्हाधिकारी कार्यालया समोर शुक्रवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांचा समूह मोठ्या संख्येने जमा होऊन मोदी विरोधात घोषणाबाजी सुरू केली.बंदोबस्तसाठी तैनात असलेल्या पोलिसांनी ताबडतोब सर्व आंदोलकांना फरफटत घेऊन गेले.पोलिसांची आणि आंदोलकांची झटापट झाली.जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काही वेळ गोंधळासारखी परिस्थिती निर्माण झाली होती.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

betkom giris

Proda Login