महाराष्ट्र

एकनाथ शिंदेंच्या बहिणीचे भावनिक पत्र

आदरणीय एकनाथ (दादा )शिंदे
मुख्यमंत्री -महाराष्ट्र राज्य

दादा!
पत्र लिहिण्यास कारण की, तू सुरू केलेली लाडकी बहीण माझी या योजने अंतर्गत आम्हाला तू महिना 1500/- रुपये देणार आहेस. पण दादा हे पैसे आम्हाला नको. याबद्दल तू … गॅस चे दर कमी कर, विजेचा दर कमी कर, चांगले रस्ते तयार कर, ट्रॅफिक समस्या सोडण्याचा प्रयत्न कर जेणेकरून असा विचार केलास तर तुझ्या भाओजीनां पैशाची चणचण लागणार नाही. त्यांच्या कमी पगारात, कमाईत पण तुझी बहीण सुखी राहील.
दादा, आणखी एक विनंती करते.. तुझ्या लाडक्या भाचा -भाचीची शाळेची फी पण काय कमी करता येते का बघ जेणे करून तुझे भाचे‌ सगळ्याना सांगतील माझा मामा मुख्यमंत्री झाला त्यामुळे मी एवढे मोठे शिक्षण घेतले म्हणून तुझ्या नावाने दिमाखात फिरतील.
माझ्या मामानं केल्यान, माझ्या मामानं केल्यान म्हणून तुझा नाव जगभर करतील.
दादा.. आम्हाला 1500 रु खरंच नको देऊ रे!
पण आमच्या संसारात ज्या आवश्यक गोष्टी लागतात तेवढ्या तरी काय कमी भाव करता येतात का तर बघ.
आम्हाला १५०० देऊन भावोजी/दाजी च्या जखमेवर मीठ तर लावत नाही ना? कारण दुधाला भाव नाही, शेतमालाला भाव नाही, शेतीला पाणी द्यायला वीज नाही, खते कीडनाशके यांचा खर्च परवडत नाही……
तुझे दाजी दररोज आत्महत्या करतात, तिकडे लक्ष देता आले तर बघा!

तूझी लाडकी बहीण ###बाई

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel

508 Insufficient Resource

The website is temporarily unable to service your request as it exceeded resouce limit. Please try again later.