‘सोलापूर’ – पूर्व भागातील श्री मार्कंडेय सोशल फाउंडेशन आणि पद्मशाली सखी संघम यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित *’यंदा रस्त्यांवर नव्हे तर, कागदावर आणि कपड्यांवर रंगांची उधळण करुयात’* या अभिनव चित्रकला स्पर्धेला उदंड प्रतिसाद मिळाला. यंदाच्या वर्षी रंगपंचमीला पाण्याचे दुर्भिक्ष लक्षात घेउन पाचवी ते दहावी विद्यार्थ्यांसाठी अनोख्या चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत जवळपास अडीशेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता.
५ वी ते १० वी विद्यार्थ्यांसाठी १ माझे न रंगवलेले चित्र ; २ मला आवडलेली फुले ; ३ संकल्प चित्र ; ४ माझा आवडता सण आणि ५ माझी सेल्फी हे विषय दिले होते, यापैकी आवडीचे विषय घेऊन विद्यार्थ्यांनी विविध रंगाची उधळन करत एकापेक्षाएक रंगतदार चित्रे साकारले होते. सदर स्पर्धेचे परिक्षक करणा-या स्मिता बंडी यांनी सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक केल्या. विद्यानिकेतन प्रशालेच्या इयत्ता १० वी मधील *दीपक अनिल चड्डे* ह्या विद्यार्थ्यांने ‘आवडता सण’ हा विषय निवडत प्रथम क्रमांक पटकावला. ७ वीच्या प्रिसीजन इंग्लिश मेडियम स्कूलच्या *तेजस चक्रधर अन्नलदास* याने ‘संकल्प चित्र’ हा विषय निवडून ‘द्वितीय क्रमांक’ मिळवला तर, ‘तृतीय क्रमांका’चे पारितोषक ‘संकल्प चित्र’ हा विषय घेउन डी. आर. इंग्लिश मेडियम मधील ७ वीच्या चिन्मय हिराचंद बोडा या विद्यार्थ्याने जिंकला. *’उत्तेजनार्थ बक्षीस’* म्हणून उमाबाई श्रविका विद्यालयातील ७ वीच्या विद्यार्थींनी आरुषी महेश कोळी हिने ‘आवडती फुले’ रंगवून ‘उत्तेजनार्थ क्रमांक’ मिळविले. ९ वीच्या वीरतपस्वी इंग्लिश मेडियम स्कूलच्या अंशुमन श्रीनिवास संगा याने ‘माझे न रंगवलेले चित्र’ हा विषय निवडून ‘उत्तेजनार्थ क्रमांक’ मिळवला, तर इ. ९ वी भू. म. पुल्ली कन्या प्रशालेमधील गौरी औदुंबर जक्कन ह्या विद्यार्थींनीने ‘माझे न रंगवलेले चित्र’ हा विषय घेऊन ‘उत्तेजनार्थ’ पारितोषिक पटकाविला.
प्रथम क्रमांकाचे पारितोषिक अंबादास कट्टा, द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक दामोदर पासकंटी, तृतीय क्रमांकाचे पारितोषक – अंबादास कट्टा यांच्या तर्फे आकर्षक आणि उपयुक्त अशी पारितोषिक विजेते यांना देण्यात येणार आहे. *’उत्तेजनार्थ पारितोषिके’..*
अंबादास कट्टा आणि दामोदर पासकंटी यांच्या पुढाकारातून उत्तेजनार्थ बक्षीसे दिले जाईल. विजेत्या आणि सहभाग घेतलेल्या स्पर्धक विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे नागेश सरगम (सरगम टी ॲन्ड कोल्ड्रींक्स – चाय पे चर्चा) यांच्याकडून देण्यात येईल. पारितोषिक वितरण *रविवार, दि. १४ एप्रिल रोजी संध्याकाळी सहाच्या वेळेला* पूर्व भागातील *श्रीराम मंदिर* येथे होईल, असे फाउंडेशनचे व सखी संघमचे संस्थापक गौरीशंकर कोंडा यांनी कळवले.