सोलापूर महानगरपालिकामहाराष्ट्रसोलापूर बातमी

सोलापुरात घरोघरी झळकताहेत कचरा संकलनाचे क्यूआर कोड…

घंटागाडीच्या माध्यमातून शहरातील किती घरांमधून अथवा व्यावसायिक अस्थापनांमधून कचरा संकलन केला गेला याची माहिती थेट महापालिकेस मिळण्यासाठी घरो घरी कचरा संकलनाचे क्यूआर कोड लावण्याचे काम युध्दपातळीवर चालू आहे. तब्बल दोन लाख ४० हजार क्यूआर कोड लावले जाणार आहेत. दोन दिवसांत तीन हजार ६५७ घरांवर हे क्यूआर कोड लावले गेले आहेत…

शहरातील कचरा संकलनाचे खासगीकरण केले आहे. दररोज तीनशे साडेतिनशे टन कचरा उचला जात आहे. त्यावर मक्तेदारांचे बिल काढले जाते. मात्र, कचरा संकलनामध्ये सावळा गोंधळ आहे. संकलन केलेला कचरा आणि कचरा डेपेमध्ये असलेल्या नोंदीमध्ये तफावत असल्याने घनकचरा व्यवस्थापनामध्ये सुधारणा करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाकडून विविध उपाययोजना वेळोवेळी राबविल्या जात आहेत. याचाच एक भाग म्हणून घनकचरा व्यवस्थापन व शहर स्वच्छतेच्या कामांच्या परिणामकारक व्यवस्थापनाकरिता राज्यातील ‘ड’ वर्ग महापालिका तसेच सर्व नगरपरिषद, नगर पंचायतमध्ये या माहिती तंत्रज्ञानावर आधारित प्रणालीचा (आयटीसी बेस्ड) वापर आवश्यक असल्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. केंद्र शासनाची कंपनी आयटीआय लिमिटेडमार्फत एक नवीन तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे. शहरातील प्रत्येक मालमत्तेवर एक विशिष्ट प्रकारचे क्यूआर कोड व ओला व सुका कचरा डब्यांवर दोन क्युआर कोड कंपनीमार्फत लावण्यात येतील..

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel