सोलापूर क्राईम

सोलापुरात पती कडून पत्नीची हत्या…

सोलापूर ( प्रतिनीधी):- सोलापूर शहरात खळबळजनक घटना घडली आहे, पती कडून चक्क पत्नीचा खून करण्यात आल्याची घटना समोर आलेली आहे .यात हकिकत अशी की, या प्रकरणातील फिर्यादी सैफन मोदीन शेख, वय ४९ वर्षे, रा. प्लॉट नं. ७, किरण नगर, स्वागत नगर जवळ सोलापूर याने दि.१५/०४/२०२४ रोजी ०६.१५ वा सुमारास , यातील फिर्यादीची पत्नी यास्मीन हिने फिर्यादीस मला तु ७० हजार रुपये कधी देणार आहेस, मला देणेकऱ्यांचे वारंवार फोन येत आहेत, तु मला आज पैसे नाही दिले तर मी तुझ्या घरी येवून गोंधळ घालुन तुला व तुझ्या घरच्यांना सोडणार नाही, तुला आज काय ते दाखवते, अशी धमकी देवून फिर्यादीचे कानाखाली मारलेने फिर्यादीने चिडुन जावून आजुबाजुला कोणीही नसल्याचे पाहुन फिर्यादीचे डावे कंबरेला खोचुन ठेवलेला चाकु बाहेर काढुन पत्नी यास्मीन हिचे उजवे गालावरुन मानेवर वार केला, त्यानंतर चाकुने दुसरा वार तिचे डावे बाजुकडील पोटात केला, तसेच चाकुने पत्नी यास्मीन हिचे दोन्ही हातांच्या मनगटांच्या नसा कापुन ती मयत झाल्याची खात्री झाल्यानंतर फिर्यादी यांनी पत्नी यास्मीन हिस ज्या चाकुने वार केले तो चाकु घेवून एमआयडीसी पोलीस ठाणे येथे हजर झाले आहेत. एमआयडीसी पोलिस ठाणे येथे कलम 302 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या खुनाचा   अधिक तपासः सपोनि- चंदनशिव हे करीत आहेत.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

betkom giris

Proda Login