महाराष्ट्र

सोलापुरात पूरग्रस्तांना गाझी जागीरदार व G1 ग्रुप कडून दिलासा…

सोलापूर शहरासह जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे सीना नदीला महापूर आला. या महापुराचा फटका नदीलगत असलेल्या अनेक गावांना बसला असून, शेकडो घरांमध्ये पाणी घुसल्याने नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक कुटुंबांना घर सोडून सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे लागले, तर काही ठिकाणी अन्न–पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली.

अशा कठीण परिस्थितीत नागरिकांच्या मदतीला AIMIM पक्षाचे शहर कार्याध्यक्ष गाझी जागीरदार आणि कम्मो शेख सोलापूर महानगरपालिकेचे माजी नगरसेवक जीवन ग्रुप धावून आले. त्यांनी वळखबार परिसरातील पूरग्रस्त भागात भेट देऊन नागरिकांना मदतकार्य केले. या वेळी जेवण, पाण्याच्या बाटल्या तसेच आवश्यक खाद्यपदार्थ मोठ्या प्रमाणावर वाटण्यात आले. त्यामुळे अनेक दिवस उपासमारीच्या परिस्थितीत असलेल्या लोकांना दिलासा मिळाला.

गाझी जागीरदार यांनी सांगितले की, “पूरग्रस्तांच्या अडचणी कमी करण्यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. गरजूंपर्यंत अन्न, पाणी आणि मदत पोहोचवणे हीच सध्या आमची जबाबदारी आहे. AIMIM पक्ष सदैव पूरग्रस्तांच्या सोबत राहील.”

कम्मो शेख यांनी सांगितले की, “पूरग्रस्तांच्या अडचणी कमी करण्यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. गरजूंपर्यंत अन्न, पाणी आणि मदत पोहोचवणे हीच सध्या आमची जबाबदारी आहे. AIMIM पक्ष सदैव पूरग्रस्तांच्या सोबत राहील.”

पूरामुळे त्रस्त झालेल्या लोकांनी या मदत उपक्रमाचे स्वागत केले असून, समाजातील विविध घटक पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे सरसावत आहेत. प्रशासनाबरोबरच सामाजिक व राजकीय संघटना पूरपरिस्थितीत मदत पोहोचवत असल्याने नागरिकांमध्ये आशेचा किरण दिसू लागला आहे.

यावेळी ए आय एम आय एम पक्षाची महिला शहराध्यक्ष सलमा सय्यद कमो शेख आधी पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते….

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel