सोलापूर बातमी

सोलापुरात मून स्टार फॅमिली रेस्टॉरंटचे भव्य उद्घाटन …

सोलापूर शहरात खाद्यप्रेमींसाठी नवी पर्वणी ठरणारे मून स्टार फॅमिली रेस्टॉरंटचे उद्घाटन मोठ्या उत्साहात आणि मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले. हैदराबाद रोडवरील नवाज हॉलच्या शेजारी सुरू झालेल्या या रेस्टॉरंटमुळे सोलापुरकरांना एक उत्तम खाद्यगृहाचा पर्याय उपलब्ध झाला आहे.

रेस्टॉरंटचे मालक तौसीफ सौदागर यांनी सांगितले की, या रेस्टॉरंटची रचना विशेषतः कुटुंबांसाठी केली असून, आरामशीर व कुटुंबवत्सल वातावरणात ग्राहकांना जेवणाचा अनुभव घेता येणार आहे. याशिवाय ग्राहकांसाठी तब्बल ४० प्रकारचे रुचकर खाद्यपदार्थ उपलब्ध करून देण्यात आले असून, स्थानिकांसोबतच बाहेरगावाहून येणाऱ्या पाहुण्यांनाही हे रेस्टॉरंट नक्कीच आकर्षित करणार आहे. त्यांनी सोलापुरातील नागरिकांना एकदा या रेस्टॉरंटला भेट देण्याचे आवाहन केले.

या भव्य उद्घाटन सोहळ्याला राजकीय, सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
त्यामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून:

सोलापूर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख

MIM पार्टीचे जिल्हाध्यक्ष शौकत पठाण

नगरसेवक रियाज हुंडेकरी

प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा संपर्कप्रमुख जमीर शेख

शिवसेना जिल्हाप्रमुख अमोल बापू शिंदे

एमआयएम पार्टीचे नगरसेवक अजहर हुंडेकरी
आदी मान्यवरांनी उपस्थिती लावून रेस्टॉरंटच्या संकल्पनेचे कौतुक केले.

कार्यक्रमाचे औचित्य साधून मान्यवरांनी रेस्टॉरंटमधील सजावट, खाद्यपदार्थांची व्यवस्था आणि फॅमिली फ्रेंडली वातावरणाचा अनुभव घेतला. सर्वांनी एकमुखाने मून स्टार फॅमिली रेस्टॉरंट हे सोलापुरातील खाद्यसंस्कृतीस नवा आयाम देईल असा विश्वास व्यक्त केला.

रेस्टॉरंटच्या उद्घाटनानंतर नागरिकांमध्येही उत्साहाचे वातावरण होते. अनेकांनी हे रेस्टॉरंट सोलापुरकरांसाठी एक नवे आकर्षण ठरेल अशी प्रतिक्रिया दिली.

नव्या पिढीला, कुटुंबांना आणि खाद्यप्रेमींना लक्षात घेऊन उभारलेले मून स्टार फॅमिली रेस्टॉरंट हे निश्चितच शहरातील एक वेगळे आणि विशेष ठिकाण ठरणार आहे…

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

betkom giris

Proda Login