सोलापुरात 2 गटात राडा…कोयत्याने वार…6 जखमी….

सोलापूर शहरातील धाकटा राजवाडा परिसरातील विठ्ठल मंदिर जवळ आज सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास दोन गटांमध्ये अज्ञात कारणावरून जोरदार हाणामारी झाली. या प्रकारात तलवार, लोखंडी रॉड आणि बॅट्ससारख्या घातक हत्यारांचा वापर करत एकमेकांवर हल्ला करण्यात आलाय. या घटनेत सहा ७ जण जखमी झाले आहेत. सर्व जखमींवर सोलापूरच्या सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
जखमींमध्ये रितेश मनोज गायकवाड, करण दीपक गायकवाड, सोहम कांबळे, सुरेश वाघमारे, सुजल कांबळे, अजय वाघमारे , आणि बलवंत खंडागळे यांचा समावेश आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली.
सिव्हिल रुग्णालयात मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सदर बाजार पोलिस चौकी व जोडभावी पेठ पोलिस चौकीचे अधिकारी रुग्णालयात पोहोचले आहेत. पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. हाणामारीचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून जुन्या भांडणातून हा प्रकार घडल्याचं बोललं जातय. पोलिसांकडून दोन्ही गटांशी संबंधित माहिती गोळा केली जात आहे.
अधिक तपास पोलिस करत आहेत



