सोलापूर बातमीमहाराष्ट्रराजकीयसोलापूर महानगरपालिकासोलापूर सामाजिक

सोलापूरकरांचा इशारा.. ठाम आणि थेट! अमोल शिंदे,चेतन नरोटे.. भिडले सत्ताधाऱ्यांशी!!

सोलापूर महानगरपालिकेत भाजपाचे १०२ पैकी ८७ नगरसेवक निवडून आले…
पण सर्वसामान्यांचा आवाज बुलंदपणे मांडण्याचा प्रयत्न
अमोल शिंदे आणि चेतन नरोटे यांनी आज महापालिकेचा सभागृहात केला !
सत्ता कितीही मोठी असो, आकडे कितीही मोठे असोत —
जनतेच्या प्रश्नांसमोर ती काहीच नाही! हे पुन्हा एकदा सोलापूरकरांसमोर या दोन नगरसेवकांनी दाखवून दिले आहे….
आज संपूर्ण सोलापूरकरांच्या आशा, अपेक्षा आणि आकांक्षा या दोघांवर आहेत , असा सूर महापालिकेतील सभेनंतर शहरभर सुरू होता….
रस्ते, पाणी, ड्रेनेज, भ्रष्टाचार, प्रशासनाची मनमानी —
या प्रत्येक प्रश्नावर ठाम उभे राहणे हीच खरी लोकप्रतिनिधीची ओळख आहे.
 कोणत्याही दबावाला झुकू नका!
 कोणत्याही आमिषाला बळी पडू नका!
 सत्तेच्या भीतीपुढे शांत बसू नका!
जनतेने तुम्हाला खुर्चीसाठी नाही,
तर लढण्यासाठी निवडले आहे!
सोलापूरकरांचा विश्वास तुटता कामा नये…
कारण हा काही फक्त नगरसेवकांचा विषय नाही —
हा संपूर्ण सोलापूरच्या स्वाभिमानाचा प्रश्न आहे!
आवाज दाबला जाणार नाही…
लढा थांबणार नाही! याचाही विचार महापालिकेतील विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी करणे गरजेचे आहे….

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel